IPL 2021: राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून तो पुढील उपचारासाठी मायदेशी देखील परतला आहे. पण मायदेशी परतल्यानंतर त्यानं थेट भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याशी पंगा घेतला आहे.
IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video
बेन स्टोक्स आयपीएल खेळत नसला तरी त्याचं प्रत्येक सामन्यावर लक्ष आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने एक ट्विट करत समालोचक सुनील गावसकर यांना ट्रोल केलं. ट्विटमध्ये स्टोक्सनं गावसकरांचं नाव घेतलेलं नाही. पण ते ट्विट गावसकर यांच्यासाठीच होतं हे लपून राहिलेलं नाही. (IPL 2021: Ben Stokes trolls Sunil Gavaskar for indifferent commentary during DC vs PBKS match)
आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!
त्याचं झालं असं की, पंजाब किंग्जचा संघ फलंदाजी करत असताना सुनील गावसकर समालोचन करत होते. सामन्याच्या 11व्या षटकात पंजाबच्या मयंक अग्रवालनं दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला दोन खणखणीत षटकार लगावले. त्यानंतर रबाडाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला बाउन्सर टाकला. राहुलने हा चेंडू देखील सीमारेषेपार टोलवला. त्यावेळी गावसकर यांनी "अतिशय खराब बाऊन्सर. जर तुम्हाला बाउन्सर टाकायचाच आहे तर तो ऑफ स्टम्पच्या वर असायला हवा", असं म्हटलं.
गावसकरांच्या या विधानानंतर रबाडानं टाकलेल्या चेंडूचा रिप्ले दाखवण्यात आला आणि त्यानं टाकलेला चेंडू अगदी ऑफ स्टम्पच्या वरच होता. यावरुनच स्टोक्सनं गावसकरांचं नाव न घेता टीका केली आहे.
दिल्लाचा पंजाबवर शानदार विजयदरम्यान, रविवार संध्याकाळचा पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना दिल्लीक कॅपिटल्सनं १० चेंडू आणि ६ गडी राखून जिंकला. पंजाब किंग्जनं दिल्लीसमोर १९५ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. पण शिखर धवनच्या तडफदार ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं सामना जिंकला.