IPL 2021: "पैसा बोलता है"; IPLमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागावर दिग्गज माजी खेळाडूचं विधान

IPL 2021: भारतात दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असतानाही आयपीएल स्पर्धा सुरू असल्याच्या मुद्द्यावर सोशल मीडियात मतमतांतरं सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:58 PM2021-04-28T15:58:29+5:302021-04-28T16:01:20+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 Cash is king Brad Hodge responds to a Twitter user regarding England and Australian players participation in IPL | IPL 2021: "पैसा बोलता है"; IPLमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागावर दिग्गज माजी खेळाडूचं विधान

IPL 2021: "पैसा बोलता है"; IPLमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागावर दिग्गज माजी खेळाडूचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: भारतात दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असतानाही आयपीएल स्पर्धा सुरू असल्याच्या मुद्द्यावर सोशल मीडियात मतमतांतरं सुरू आहेत. अनेक माजी खेळाडूंनी आयपीएल रद्द करण्याचाही मुद्दा उपस्थित केला आहे. यात स्पर्धेत सहभागी असलेल्या काही खेळाडूंनी भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत स्पर्धेतून माघार देखील घेतली आहे. बीसीसीआयनं मात्र स्पर्धा सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे अनेक खेळाडू आयपीएलचे भाग आहेत. यावर आता ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक ब्रॅड हॉग यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. (‘Cash is king’ – Brad Hodge responds to a Twitter user regarding England and Australian players’ participation in IPL)

IPL 2021: धोनीच्या आई-वडिलांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द करणं पसंत केलं. पण भारतात आयपीएलसाठी मात्र दोन्ही संघांतील खेळाडू खेळत आहेत. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. हाच मुद्दा एका ट्विटर युझरनं उपस्थित केला. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगनं केवळ दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!

''Cash Is King'', अशी प्रतिक्रिया ब्रॅड हॉग यांनी दिली आहे. या ट्विटची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून क्रिकेट वर्तुळात यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ब्रॅड हॉग देखील क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याआधी आयपीएलमध्ये ६६ सामने खेळले आहेत. २००८ ते २०१४ या कालावधीत ब्रॅड हॉग आयपीएलमध्ये खेळला आहे आणि आयपीएल करिअरमध्ये त्याच्या नावावर १४०० धावा देखील आहेत. २००९ सालच्या आयपीएलमध्ये ब्रॅड हॉगनं त्याची सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्या सीझनमध्ये ब्रॅड हॉगनं ३६५ धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. 

आयपीएलचं सध्या १४ वं सीझन सुरू असून स्पर्धा सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ सध्या सर्वाधिक गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बंगलोरनं सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. ३० मे रोजी आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. 

दरम्यान, भारतातील कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि अँड्रयू टाय यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. 
 

Web Title: ipl 2021 Cash is king Brad Hodge responds to a Twitter user regarding England and Australian players participation in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.