CSK vs DC, IPL 2021, Match Prediction: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला जोशात सुरुवात झालीय. मुंबई विरुद्ध बंगळुरूचा पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. त्यामुळे सुरुवातच इतकी दमदार झालीय की आता क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता ताणली गेली आहे. प्रत्येक संघात यावेळी काहीतरी नवे बदल आणि नव्या दमाचे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यात आजच्या दिल्ली विरुद्ध चेन्नईचा सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेल्यानं दिल्ली कॅपिटल्सची धुरा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतकडे देण्यात आलीय. तर दुसरीकडे गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी केलेला महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ यंदा नव्या दमासह मैदानावर उतरणार आहे. त्यात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (IPL 2021, Match Preview, Super Kings vs Capitals, 2nd Match)
धोनी अखेरची आयपीएल खेळतोय? CSKच्या CEOनी स्पष्टच सांगितलं
दिल्लीसमोर मोठी समस्या
दिल्ली कॅपिटल्सचा नवनिर्वाचित कर्णधार रिषभ पंत सध्या तुफान फॉर्मात असला तरी कर्णधार म्हणून संघाला कसं पुढे घेऊन जाऊ शकतो याची परीक्षा असणार आहे. त्यात दिल्लीचं वेगवान अस्त्र कगिसो रबाडा, अॅन्रिच नॉर्जे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. पाकिस्तान विरुद्धची मालिका संपवून ते ६ एप्रिल रोजी भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे क्वारंटाइनच्या नियमांचे ते पालन करत आहेत. रबाडा आणि नॉर्जेची कमतरता दिल्लीला पहिल्या सामन्यात मारक ठरू शकते. चेन्नई सुपरकिंग्जचा लुंगी निगिडीच्या बाबतीतही तिच समस्या आहे. तोही क्वारंटाइन असल्यानं पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीय.
दिल्लीसमोर आणखी एक अडचण म्हणजे फिरकीपटू अक्षर पटेल कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानं तोही सामन्याला मुकणार आहे.
चेन्नई दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज
आयपीएलच्या आजवरच्या सर्व सीझनमध्ये प्ले-ऑफपर्यंत मजल मारलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला गेल्या मोसमात गुणतालिकेत सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. गेल्या मोसमातली निराशाजनक कामगिरी पुसून टाकण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज झाली आहे. त्यात 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैना पुन्हा एकदा मैदानात दिसणार असल्यानं त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा कोणता संघ जिंकणार?, इंग्लंडच्या माजी कर्णधारानं केली भविष्यवाणी!
आकडेवारीत चेन्नईच अव्वल
चेन्नई विरुद्ध दिल्लीची आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई सुपरकिंग्ज सरस ठरली आहे. आतापर्यंत चेन्नईनं दिल्लीविरुद्ध १५ लढती जिंकल्या आहेत. तर दिल्लीनं चेन्नईला ८ वेळा नमवलं आहे.
संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)
मोइन अली (Moeen Ali), फॅफ डू प्लेसिस (Faf du Plessis), सुरेश रैना (Suresh Raina), अंबाती रायुडू (Ambati Rayudu), एम.एस.धोनी (MS Dhoni (capt & wk), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), सॅम कुरन (Sam Curran), ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo), के. गौतम (K Gowtham), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), दिपक चाहर (Deepak Chahar)
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), शिखर धवन (Shikhar Dhawan), स्टीव्ह स्मिथ (Steven Smith), रिषभ पंत (Rishabh Pant (capt & wk), मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis), शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), ख्रिस वोक्स (Chris Woakes), आर.अश्विन (R Ashwin), उमेश यादव (Umesh Yadav), अमित मिश्रा (Amit Mishra), इशांत शर्मा (Ishant Sharma)
Web Title: ipl 2021 chennai super kings vs delhi capitals match prediction and playing eleven
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.