IPL 2021 : आला चहर, केला कहर!, चेन्नई सुपरकिंग्जची विजयी डरकाळी; पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी पराभव

IPL 2021: वेगवान गोलंदाज दीपक चहरने पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:24 AM2021-04-17T06:24:26+5:302021-04-17T06:25:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Chennai Super Kings' winning streak; Punjab Kings defeated by 6 wickets | IPL 2021 : आला चहर, केला कहर!, चेन्नई सुपरकिंग्जची विजयी डरकाळी; पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी पराभव

IPL 2021 : आला चहर, केला कहर!, चेन्नई सुपरकिंग्जची विजयी डरकाळी; पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन

मुंबई : पंजाब किंग्ज संघाला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने ६ गड्यांनी बाजी मारली. चेन्नईने यंदाचा पहिला विजय मिळवत गुणांचे खातेही उघडले. पंजाबला ८ बाद १०६ धावांत रोखल्यानंतर चेन्नईने आवश्यक लक्ष्य १५.४ षटकांत 
४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. चेन्नईकडून खूप दिवसांनी सांघिक खेळ पाहण्यास मिळाला. वेगवान गोलंदाज दीपक चहरने पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला.
फाफ डूप्लेसिस (३६*) आणि मोईन अली (४६) यांंनी दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा विजय साकारला. संथ खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत चेन्नईने विजय मिळवला असला तरी, अतिआक्रमतेच्या नादात सुरेश रैना, अंबाती रायुडू यांनी विकेट फेकल्याने चेन्नईला विजय निश्चित करण्यास काहीसा वेळ लागला.
एकतर्फी झालेल्या या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी घाई केली. त्यात रवींद्र जडेजाने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याने दोन झेल घेत कर्णधार राहुलला अप्रतिम धावबाद केले. 
चेंडू स्विंग होत असताना पॉवर प्लेमध्ये संयमी फलंदाजीची गरज होती. मात्र, तिथेच चार फलंदाज गमावल्याने पंजाबच्या हातून सामना निसटला. युवा शाहरुख खानचा (४७) अपवाद वगळता पंजाबकडून कोणालाही खेळपट्टीवर टिकता आले नाही. चहरने पंजाबच्या फलंदाजीला सुरुंग लावत मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन व दीपक हुडा यांंना बाद केले. 

- महेंद्रसिंग धोनीने सीएसकेकडून २००वा सामना खेळला.
- रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक २२ धावबाद करण्याचा विक्रम करत महेंद्रसिंग धोनीला (२१) मागे टाकले.
- २०१८ सालापासून आतापर्यंत आयपीएलमध्ये पॉवर प्ले षटकांत दीपक चहरने सर्वाधिक ३५ बळी घेतले. मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्ट (२३) दुसऱ्या स्थानी आहे.
n मोसमातील पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद होणारा पूरन तिसरा फलंदाज ठरला.
 

Web Title: IPL 2021: Chennai Super Kings' winning streak; Punjab Kings defeated by 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.