IPL 2021 : अखेर सुरेश रैनाला 'बालकनी'वाली खोली मिळाली, सोशल मीडियावर MS Dhoni सोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली!

IPL 2021 Remaining matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 09:07 PM2021-08-13T21:07:01+5:302021-08-13T21:13:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : CSK players have got balconies this time in Dubai, Suresh Raina sharing his balcony view after reaching UAE  | IPL 2021 : अखेर सुरेश रैनाला 'बालकनी'वाली खोली मिळाली, सोशल मीडियावर MS Dhoni सोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली!

IPL 2021 : अखेर सुरेश रैनाला 'बालकनी'वाली खोली मिळाली, सोशल मीडियावर MS Dhoni सोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Remaining matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचा ताफा आजच दुबईत पोहोचला असून त्यांच्या पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा संघही दुबईसाठी दाखल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार मेहंद्रसिंग धोनी, पत्नी साक्षी व मुलगी जिवा यांच्यासह यूएईत दाखल झाला आहे आणि त्याच्यासोबत संघातील सर्व खेळाडूही आहेत. पण, सुरेश रैनानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्यात रैनानं खोलीच्या बालकनीतून समुद्र किनारा दिसत असल्याचा फोटो आहे. त्यावरून आयपीएल २०२०मधील एका भांडणाची चर्चा सुरू झाली...


 

काय घडलं होतं २०२०त ?
आयपीएलच्या मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सला धक्क्यांमागून धक्के बसले होते. सुरेश रैनानं कर्णधार धोनीसोबत भांडून स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी बालकनी असलेला रूम न मिळाल्यामुळे रैना नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. त्या अफवा ठरल्या. त्यामुळेच जेव्हा रैनानं शुक्रवारी फोटो पोस्ट केला त्यानंतर जुन्या वादाची चर्चा सुरू झाली...

नेटिझन्स सुसाट... 

 

 

चेन्नईचे खेळाडू यूएईत दाखल...

आयपीएल २०२१मधील CSK चे वेळापत्रक

  • 19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 24 सप्टेंबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
  • 30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
  • 7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
     

Web Title: IPL 2021 : CSK players have got balconies this time in Dubai, Suresh Raina sharing his balcony view after reaching UAE 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.