IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update : पृथ्वी शॉ ( Prithvi shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची सहजतेनं धुलाई केली. १८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. CSKच्या खेळाडूंनी पृथ्वीला दिलेले दोन जीवदान महागात पडले. पराभव समोर दिसताना CSKच्या खेळाडूंकडून विजयासाठीचा संघर्षही दिसला नाही. रिषभ पंत व मार्कस स्टॉयनिसनं DCचा विजय पक्का केला. दिल्लीनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. ipl 2021 t20 Csk vs dc live match score updates mumbai
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावाशिखर धवन - ९०२*विराट कोहली - ९०१रोहित शर्मा - ७४९डेव्हिड वॉर्नर - ६१७ एबी डिव्हिलियर्स - ५९३रॉबीन उथप्पा - ५९०
दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी माहेला जयवर्धने/वीरेंद्र सेहवाग - १५१ वि. मुंबई इंडियन्स, २०१३डेव्हिड वॉर्नर/वीरेंद्र सेहवाग - १४६ वि. पंजाब किंग्स, २०११पृथ्वी शॉ/ शिखर धवन - १३८ वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२१
सुरेश रैनाची खेळी व्यर्थसुरेश रैनानं ( Suresh Raina) दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची वाट लावली. CSKचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. सुरेश रैना ६९९ दिवसानंतर मैदानावर उतरला अन् काय तुफान खेळला; रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी
अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना चेन्नईला मोठी मजल मारू दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १८८ धावा करून दिल्या. सॅम १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा चोपून माघारी परतला. जडेजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला.