IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update : फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैना ( Suresh Raina) व मोईन अली ( Moeen Ali) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) डाव सावरला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) च्या गोलंदाजांची धुलाई करताना दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यूएईत झालेल्या आयपीएलला चेन्नईला मधल्या फळीतील समस्या सतावत होती, परंतु रैनाच्या येण्यानं ती बाजू भक्कम झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ६९९ दिवसानंतर CSK कडून पहिलाच सामना खेळणाऱ्या सुरेश रैनाच्या तुफान फटकेबाजीनं DC च्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. पण, त्याच्या स्फोटक खेळीचा शेवट दुर्दैवी झाला. IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update
CSK चे दोन्ही सलामीवीर ७ धावांवर माघारी दुसऱ्याच षटकात आवेश खाननं CSKला पहिला धक्का दिला. फॅफ ड्यू प्लेसिसला त्यानं भोपळ्यावर पायचीत केलं. Bowlers to dismiss Faf Duplessis on Duck in IPL आयपीएलमध्ये चौथ्यांदा फॅफ शून्यावर माघारी परतला आहे. ख्रिस वोक्सनं CSKचा दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला ( ५) शिखर धवनकरवी स्लीपमध्ये झेलबाद केले. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. आर अश्विननं टाकलेल्या ९व्या षटकात सलग दोन षटकार खेचल्यानंतर तिसरा फटका मारण्याचा मोह अलीला आवरता आला नाही. शिखर धवननं त्याचा सुरेख झेल टिपला. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. त्याच षटकात रैनानं खणखणीत षटकार खेचून १८ धावा चोपल्या. सुरेश रैना ६९९ दिवसानंतर मैदानावर उतरला अन् काय तुफान खेळला; रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी
सुरेश रैनाचे ३९ वे अर्धशतकसुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. त्यानं ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे ३९वे अर्धशतक ठरले आणि त्यानं विराट व रोहित यांच्या ३९ अर्धशतकांशी बरोबरी केली. IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला.
दुर्दैवी धावबाद रैना फटकेबाजी करत होता, परंतु १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेताना रैना व रवींद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ चुकला अन् रैनाला माघारी परतावे लागले. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या. दुसरी धाव घेताना आवेश खान जडेजाच्या मार्गात उभा होता आणि त्यामुळे रैनाला तो कॉल करू शकला नाही. त्यामुळे रैनाला रन आऊट होऊन माघारी जावं लागलं. महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. IPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान
पाहा व्हिडीओ..