IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्सची सलामीवीची जोडी फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये माघारी परतली अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांची दैना उडाली. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी चेन्नईचं विकेट पडणे थांबवले, परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले आणि या दोघांना सहाच्या सरासरीनंच धावा करता आल्या. दोघांचीही बॅट चेंडूला कनेक्ट होत नव्हती. खेळपट्टीवर जवळपास १० षटकं टिकूनही या जोडीला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
आजच्या सामन्यात दिल्लीनं स्टीव्ह स्मिथच्या जागी गुजराजच्या रिपाल पटेलला पदार्पणाची संधी दिली, तर चेन्नईनं सॅम कुरन, आसीफ व रैना यांच्या जागी ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर व रॉबीन उथप्पा यांना खेळवले आहे. शिखर धवनचा आजचा हा ३०० वा ट्वेंटी-२० सामना आहे. भारताकडून रोहित शर्मा ( ३५४), महेंद्रसिंग धोनी ( ३४३), सुरेश रैना ( ३३६), दिनेश कार्तिक ( ३२३) आणि विराट कोहली ( ३१६) यांनी हा पराक्रम आधी केला आहे.
मागच्या सामन्यातील शतकवीर ऋतुराज याला पहिल्याच षटकात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला असता, परंतु फॅफमुळे त्याची विकेट वाचली. अॅनरिच नॉर्ट्जे यानं टाकलेला पहिलाच चेंडू सुसाट वळला अन् यष्टींच्या वरून रिषभ पंतच्या हाती विसावला, दुसरा चेंडू मात्र दिशाहीन राहिला आणि डावीकडून तो Wide ठरत सीमारेषेपार गेला. त्यापुढील चेंडू ऋतुराजच्या पॅडवर आदळला आणि जोरदार अपील झाले. अम्पायर अनील चौधरी यांनी त्याला LBW बाद दिले. त्यानंतर ऋतुराज नाराज झाला अन् अनुभवी फॅफकडे धावला. फॅफनं त्याला DRS घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यात चेंडू यष्टींना चूकवत असल्याचे दिसले अन् ऋतुराज नाबाद राहिला. त्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद उडाला. ऋतुराजनं पहिल्या षटकात १६ धावा कुटल्या.
धोनीची ही आयपीएलमधील २५+ चेंडूंचा सामना करूनही सर्वात संथ खेळी ठरली. यापूर्वी २००८मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्यानं ३१ चेंडूंत २३ धावा केल्या होत्या. ( In IPL, this is the slowest innings for MS Dhoni after batting 25+ balls. Previously, against Deccan Chargers in 2008, he had scored 23 off 31 at a strike rate of 74.2) चेन्नईला ५ बाद १३६ धावांवरच समाधान मानावे लागले. रायुडू ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.