IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates : आयपीएलच्या मागील पर्वात गाशा गुंडाळणारा पहिला संघ ते आयपीएल 2021मध्ये प्ले ऑफचं तिकिट पक्कं करण्याचा पहिला मान... चेन्नई सुपर किंग्सची ( CSK) ही भरारी चाहत्यांना सुखावणारी आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली CSKनं दमदार कामगिरी केली आहे आणि आज त्यांचा सामना आणखी एका दमदार कामगिरी करणाऱ्या संघाशी म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सशी ( DC) आहे. उभय संघांमध्ये जय-पराजयाचे पारडे हे चेन्नईच्या बाजूनं १५-७ असा आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. CSKनं आज सुरेश रैनाला बाकावर बसवून रॉबीन उथप्पाला पदार्पणाची संधी दिली आहे.
- CSK हा आयपीएलमध्ये षटकार खेचणारा सर्वोत संघ आहे. त्यांनी या पर्वात सर्वाधिक ९६ षटकार खेचले आहेत आणि त्यात ऋतुराज गायकवाडचा ( २०) सर्वाधिक वाटा आहे.
- आज चेन्नईला नमवल्यास दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये विजयाचं शतक साजरं करेल.
- ड्वेन ब्राव्होला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन गडी बाद करावे लागतील, ट्वेंटी-२० असा पराक्रम करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरेल.
- ड्वेन ब्राव्होनं आज तीन विकेट्स घेतल्यास , तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा दुसरा गोलंदाज बनेल
चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, रॉबीन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड ( Chennai Super Kings (Playing XI): Ruturaj Gaikwad, Faf du Plessis, Robin Uthappa, Moeen Ali, Ambati Rayudu, MS Dhoni(w/c), Ravindra Jadeja, Dwayne Bravo, Shardul Thakur, Deepak Chahar, Josh Hazlewood)
दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिपाल पटेल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्टजे, आवेश खान ( Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 Shikhar Dhawan, 3 Ripal Patel, 4 Shreyas Iyer, 5 Rishabh Pant (capt & wk) 6 Shimron Hetmyer, 7 Axar Patel, 8 R Ashwin, 9 Kagiso Rabada, 10 Anrich Nortje, 11 Avesh Khan)
Web Title: IPL 2021, CSK vs DC Live Updates : Delhi Capitals won the toss and decided to bowl first, Robin Uthappa replaces Suresh Raina
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.