IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Highlights : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली. शार्दूल ठाकूरनं १५व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना चेन्नईच्या तराजूत झुकवला होता, परंतु त्या एका चूकीनं गेम पलटला. दिल्लीनं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या टॉप टूमध्ये स्थान पटकावले. आता तर ते २० गुणांसह अव्वल स्थानावर आहेत.
IPL 2021, CSK vs DC Match Highlights :
- सलामीवीर फेल, तर सर्वच अवघड होऊन बसेल, याची प्रचिती आज चेन्नईला आलीच असेल. आतापर्यंतच्या सामन्यात चेन्नईच्या धावसंख्येचा मोठा भार खांद्यावर उचलणारे दोन शिलेदाज आज अपयशी ठरले. फॅफ ड्यू प्लेसिस (१०) व ऋतुराज गायकवाड ( १३ ) ही जोडी पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये माघारी परतली.
- महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी चेन्नईचं विकेट पडणे थांबवले, परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले. ६२ धावांत चार फलंदाज माघारी परतल्यामुळे महेंद्रसिंग धोनीला लवकर मैदानावर उतरावे लागले. धोनीचा बचावात्मक खेळ कंटाळवाणा वाटत होता.
- रायुडूनं १९व्या षटकांत काही फटके मारले, परंतु त्यानं भरपाई होण्यातली नव्हती. त्यानं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. अखेरच्या षटकात आवेश खाननं ही भागीदारी तोडताना २७ चेंडूंत १८ धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईला ५ बाद १३६ धावांवरच समाधान मानावे लागले. रायुडू ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला.
- पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी झटपट २४ धावा जोडल्या, परंतु दीपक चहरनं ही जोडी तोडली. पृथ्वी १८ धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर ( २) व रिषभ पंत ( १५) हेही अपयशी ठरले. लक्ष्य मोठं नसल्यानं दिल्लीवर एवढं दडपण जाणवत नव्हते. पण, १५ व्या षटकात शार्दूल ठाकूरनं DCला दणके दिले. पहिल्या चेंडूवर त्यानं आर अश्विनला ( २) आणि अखेरच्या चेंडूवर शिखरला ( ३९ धावा, ३५ चेंडू, ३ x ४, २ x 6 ) बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद ९९ अशी केली.
- दिल्लीला तीन षटकांत २८ धावा करायच्या होत्या. तेव्हा धोनीनं त्याचा ट्रम्प कार्ड ड्वेन ब्राव्होला मैदानावर उतरवले. तिसऱ्या चेंडूवर बदली खेळाडू के गौथमनं सोपा झेल सोडूला अन् हेटमायरला आणखी एक चौकार मिळाला. हा सामन्यातील गेम चेंजींग क्षण ठरला. याच हेटमायरनं १८ चेंडूंत नाबाद २८ धावा करताना दिल्लीचा विजय पक्का केला.
Web Title: IPL 2021, CSK vs DC Match Highlights : Delhi Capitals confirm the Top 2 spots for the successive years now, Watch Game-changing moment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.