इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघानं ( DC) ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि गुरू-शिष्याच्या लढाईत रिषभ पंतनं ( Rishabh Pant) बाजी मारली. चेन्नईनं ( Chennai Super Kings) उभ्या केलेल्या १८८ धावांचा डोंगर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्या दमदार सुरूवातीच्या जोरावर दिल्लीनं ( Delhi Capitals) संघानं सहज पार केले. या सामन्यात ही सेट झालेली जोडी तोडण्यासाठी धोनीनं 'मून' बॉलवर धवनला स्टम्पिंग करण्याचा प्रयत्न केला. मोईन अलीनं तो चेंडू टाकला होता. पण अम्पायरनी तो नो बॉल ठरवला अन् DCला अतिरिक्त धाव व फ्री हिट मिळाला. सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका
पाहा व्हिडीओ...
पृथ्वी शॉ ( Prithvi shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची सहजतेनं धुलाई केली. १८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. पृथ्वीला जीवदान देण्याची चूक CSKला महागात पडली. दोन्ही खेळाडू अगदी सहजतेनं CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होते, कोणताच आक्रमकपणा त्यांच्या फटक्यात नव्हता, होतं फक्त टायमिंग... KKRच्या खेळाडूच्या पत्नीसोबत राशिद खानचा सोशल वॉर; सामन्यापूर्वीच मैदानाबाहेर तापले वातावरण!
पृथ्वी शॉ ३८ चेंडूंत ७२ धावांवर माघारी परतला आणि त्यात ९ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. शिखर धवनही ५४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८५ धावांवर माघारी परतला. आयपीएलमध्ये ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. कॅटरिना कैफशी २ मिनिटांचं बोलणं, ही सर्वात मोठी ऑफ फिल्ड अचिव्हमेंट; विराट कोहलीचा Video Viral
दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी माहेला जयवर्धने/वीरेंद्र सेहवाग - १५१ वि. मुंबई इंडियन्स, २०१३डेव्हिड वॉर्नर/वीरेंद्र सेहवाग - १४६ वि. पंजाब किंग्स, २०११पृथ्वी शॉ/ शिखर धवन - १३८ वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२१