Join us  

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Sunday Blockbusterमध्ये रिषभ पंतचा विक्रम, चेन्नईनं नाणेफेक जिंकून खेळला मोठा डाव

IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : महेंद्रसिंग धोनीचा हा आयपीएलमधील २५वा प्ले ऑफ सामना आहे आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक प्ले ऑफ खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 7:07 PM

Open in App

IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यात क्वालिफायर १ ( Qualifier 1) चा सामना होणार आहे. एकीकडे महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) अनुभव, तर दुसरीकडे रिषभ पंतचा ( Rishabh Pant) युवा जोश, CSKकडे अनुभवी व युवा खेळाडूंचा ताळमेळ आहे, तर DC कडे युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे आजचा ब्लॉकबस्टर सामना हा चाहत्यांसाठी क्रिकेटची खरी मेजवानी घेऊन येणारा आहे. पण, यंदाच्या पर्वात दिल्लीनं दोन्ही साखळी सामन्यात चेन्नईवर विजय मिळवला आहे आणि हीच गोष्ट चेन्नईचं टेंशन वाढवणारी आहे. चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

चेन्नईला साखळी सामन्याच्या अखेरच्या तिन्ही सामन्यांत हार मानावी लागली आहे. सुरेश रैना दुखापतीमुळे संघाबाहेर होता, तर सॅम कुरननंही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अशात धोनी आजच्या सामन्यासाठी कोणता संघ मैदानावर उतरवतो, याची उत्सुकता आहे. आयपीएल २०२१त १४ गोलंदांनी डेथ ओव्हर्समधली ६० चेंडू फेकली आहेत, त्यापैकी कागिसो रबाडाची इकॉनॉमी ही सर्वात वाईट म्हणजे १०.८४ इतकी आहे. आवेश खाननं २०, तर कागिसोनं १३ डेथ ओव्हर्स फेकली आणि त्यांनी ९.१५च्या सरासरीनं धावा दिल्यात. चेन्नईनं प्ले ऑफमध्ये दिल्लीला दोनवेळा पराभूत केले आहे. 

महेंद्रसिंग धोनीचा हा आयपीएलमधील २५वा प्ले ऑफ सामना आहे आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक प्ले ऑफ खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ( 25th play-off match for MS Dhoni in IPL). रिषभ पंतही आयपीएल प्ले ऑफ/उपांत्य फेरी/ बादफेरी खेळणारा युवा कर्णधार ठरला. (Youngest captains in playoffs/semis/knockouts in IPL). रिषभ २४ वर्ष व ६ दिवसांचा आहे. यापूर्वी २०१९मध्ये श्रेयस अय्यरनं ( २४ वर्ष व १५५ दिवस), २०१५मध्ये स्टीव्ह स्मिथनं ( २५ वर्ष व ३५२ दिवस), २०१३मध्ये रोहित शर्मानं ( २६ वर्ष व २१ दिवस) आणि २००८मध्ये युवराज सिंगनं ( २६ वर्ष व १७१ दिवस) हा विक्रम नोंदवला होता.    सुरेश रैना आजही संघाबाहेरचेन्नई सुपर किंग्सनं आजच्या सामन्यात कोणताच बदल केलेला नाही आणि त्यामुळे सुरेश रैना आज खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रॉबीन उथप्पा, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड

दिल्ली कॅपिटल्सचा संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, टॉम कुरन, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आऱ अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अॅनरिच नॉर्ट्जे 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनी
Open in App