IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यात क्वालिफायर १ ( Qualifier 1) सामन्यात जशी सुरुवात अपेक्षित होती, तशीच झाली. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं धडाकेबाज खेळी केली, परंतु महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) चतुर नेतृत्वाची झलक दाखवताना दिल्लीच्या धावांभवती फास आवळला. पण, सुरूवातीला सावध खेळ करून स्थिरस्थावर झालेल्या शिमरोन हेटमायर व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी पाचव्या विकेटसाठी दमदार खेळी करताना चेन्नई समोर तगडं आव्हान उभं केलं.
पृथ्वी शॉ व शिखर धवन यांना संघाला चांगली सुरूवात करून देता आली नाही. पहिलं षटक सावधपणे खेळल्यानंतर पृथ्वीनं दुसऱ्या षटकात गिअर बदलला अन् जोश हेझलवूडला १२ धावा कुटल्या. तिसऱ्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर पृथ्वीनं मारलेले चार सलग चौकार बहारदार होते. पृथ्वी गॅपमध्ये अप्रतिम खेळत होता. नशीबाचीही त्याला साथ मिळली. चौथ्या षटकात हेझलवूडनं धवनला ( ७) बाद केले. दिल्लीला दुसरा धक्काही हेझलवूडनंच दिला. श्रेयस अय्यर ( १) चुकीचा फटका मारून ऋतुराज गायकवाडच्या हातून झेलबाद झाला. उत्तुंग उडालेला चेंडू ऋतुराजनं सुरेख टिपला. अक्षर पटेलला बढती मिळाली, परंतु तो सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत खेळताना दिसला. दुसऱ्या बाजूनं पृथ्वी सॉलिड खेळत होता आणि त्यानं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ( Prithvi Shaw half century)
अक्षरनं ( १०) बचावात्मक टू आक्रमक मोडमध्ये जाण्याचा प्रयत्न केला अन् मोईन अलीच्या गोलंदाजीवर टोलावलेला चेंडू मिचेल सँटनरनं सहज झेलला. अक्षरला बढती देण्याचा निर्णय दिल्लीवर उलटला अन् रन रेट खाली घसरला. दडपणात पृथ्वीनं पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. फॅफ ड्यू प्लेसिसनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपून ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा करणाऱ्या पृथ्वीला माघारी जाण्यास भाग पाडले. शिमरोन हेटमायर व रिषभ पंत ही नवी जोडी खेळपट्टीवर आल्यानंतर धोनीनं चतुर डोकं वापरून दिल्लीवर दडपण निर्माण करण्यास सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून CSKच्या गोलंदाजांनी रोखलं. ( Josh Hazlwood took two imp wickets)
मोईन अलीनं ४ षटकांत २७ धावांत १ विकेट घेतली. धोनीनं १५व्या षटकात डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ड्वेन ब्राव्हो याला पाचारण केले. हेटमायर व रिषभ यांनीही गिअर बदलताना ९च्या सरासरीनं धावा कुटण्यास सुरुवात केली. शार्दूलच्या स्लोव्हरवर रिषभनं एका हातानं मारलेला षटकात अप्रतिम होता. या जोडीनं ४० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना दिल्लीलाही कमॅबक करून दिले. दिल्लीनं १८व्या षटकात धावफलकावर १५० धावा झळकावल्या. १९व्या षटकात हेटमार ३७ धावांवर ( २७ चेंडू) बाद झाला. ब्राव्होनं ही विकेट घेताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५५०बळी पूर्ण केले आणि हा पराक्रम करणाता तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. ( Dwayne Bravo 550 wickets in T20 cricket). त्यानंतर इम्रान ताहीर ( ४२०) याचा क्रमांक येतो. रिषभ ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या.
Web Title: IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Dwayne Bravo became the first player in the world to take 550 wickets in T20 cricket, DC have made 172/5
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.