IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Rishabh Pant चा वन हँड षटकार पाहिलात का?; नसेल तर हा Video बघा

Rishabh Pant रिषभ ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 09:41 PM2021-10-10T21:41:42+5:302021-10-10T21:42:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Unbelievable: Rishabh Pant’s one-handed 86-metre SIX, Watch Video | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Rishabh Pant चा वन हँड षटकार पाहिलात का?; नसेल तर हा Video बघा

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Rishabh Pant चा वन हँड षटकार पाहिलात का?; नसेल तर हा Video बघा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Chennai Super Kings vs Delhi Capitals Qualifier 1 Live : पृथ्वी शॉ व रिषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) क्वालिफायर १ सामन्यात  चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले. पृथ्वीनं सुरुवात दमदार करून दिली, परंतु मधल्या फळीला अपयश आलं. शिमरोन हेटमायर व रिषभ ( Rishabh Pant) यांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. रिषभनं डावाच्या अखेरच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण केल. त्यानं एका हातानं मारलेला षटकार हा आजच्या सामन्यातील चर्चेचा विषय ठरतोय.. 

शिखर धवनला आज अपयश आले असले तरी पृथ्वी सॉलिड खेळला आणि त्यानं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अक्षर पटेलला प्रमोशन मिळालं, परंतु तो अपयशी ठरला. पृथ्वीनं ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर हेटमायर व रिषभ यांची दमदार खेळ केला.  दिल्लीनं १८व्या षटकात धावफलकावर १५० धावा झळकावल्या. १९व्या षटकात हेटमार ३७ धावांवर ( २७ चेंडू) बाद झाला. ब्राव्होनं ही विकेट घेताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५५०बळी पूर्ण केले आणि हा पराक्रम करणाता तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. रिषभ ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या. 

पाहा रिषभ पंतचा षटकार...



 

Web Title: IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Unbelievable: Rishabh Pant’s one-handed 86-metre SIX, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.