ipl 2021 t20 Csk vs dc live match score updates mumbai : गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) साजेशी कामगिरी करता आली नाही. पण, हा नकोसा रेकॉर्ड विसरून पुन्हा एकदा चेन्नईचा संघ नव्या दमानं पुर्वीच्या फॉर्मात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर CSK आयपीएल २०२१मधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुरू विरुद्ध शिष्य असा आहे. पण, या सामन्याआधीच दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) धोनीची धास्ती घेतली आहे. सामन्यापूर्वी धोनीनं चेन्नईच्या सराव सत्रात वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले आणि CSK नं तो व्हिडीओ पोस्ट करून रिषभ पंतचे टेंशन वाढवले आहे. गुरू vs चेला!; महेंद्रसिंग धोनी-रिषभ पंत सामन्यासाठी रवी शास्त्री आतुर; केलं मजेशीर ट्विट
आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर असलेले विक्रम - आयपीएलमध्ये सर्वाधिक २०४ सामने- RCBविरुद्ध सर्वाधिक ८३२ धावांचा विक्रम- आयपीएलमध्ये सर्वाधिक २०९ षटकार मारणारा भारतीय फलंदाज- आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा एकमेव कर्णधार- ६ एप्रिल २०१३ ते १४ एप्रिल २०१९ या कालावधीत धोनीनं सलग ८५ सामन्यांत नेतृत्व सांभाळले आणि गौतम गंभीरनंतर ( १०७) ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. अजिंक्य रहाणे की स्टीव्ह स्मिथ?; MS Dhoniचा सामना करण्याआधीच रिषभ पंत कन्फ्यूज!- डेथ ओव्हरमध्ये ( १७ ते २० षटकं) सर्वाधिक १४१ षटकारांचा विक्रम
आयपीएल २०२१मध्ये कोणते विक्रम खुणावतायेत - दोन बळी आणि आयपीएलमधील धोनीच्या नावावरील बळींचे दीडशतक पूर्ण. असा विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक- १७९ धावा करताच तो ट्वेंटी-२०त ७००० धावांचा पल्ला गाठेल- १४ षटकार अन् चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण