IPL 2021, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर लीग २०२१ ( IPL 2021) च्या प्ले ऑफमधील स्थान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( CSK) पहिल्या दहा षटकांत समाधानकारक खेळ केला. त्यांनी ३ विकेट्स गमावल्या असल्या तरी ७.८च्या सरासरीनं धावांची गती कायम ठेवली आहे. पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिल माघारी परतल्यानंतरही त्यांनी जबरदस्त कमबॅक केले. मात्र, या सामन्यात शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) हॅटट्रिक पूर्ण केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) सहावं षटक फेकण्यासाठी शार्दूलला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरची विकेट घेतली. आयपीएल २०२१मध्ये त्यानं या विकेटसह एकप्रकारे हॅटट्रिक पूर्ण केली.
KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात दीपक चहरच्या चेंडूवर LBWच्या अपीलवर मैदानावरील अम्पायरनं गिलला बाद दिले, परंतु त्यानं DRS घेतला अन् त्यामुळे तो वाचला. पण, पुढच्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरच्या लेट कॉलनं त्याचा घात केला. अंबाती रायुडूनं डायरेक्ट हिटवर त्याला धावबाद केले. त्यानंतर राहुल त्रिपाठी व अय्यर या जोडीनं KKRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी महेंद्रसिंग धोनीनं यष्टिंमागे त्रिपाठीचा अफलातून झेल टिपला, परंतु अम्पायरनं त्याला नाबाद दिल्यानं धोनीचा पारा चढला. त्या षटकातील तो दुसरा बाऊन्सर असल्यानं अम्पायरनं तो नो बॉल दिला. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यर ( १८) धोनीच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
आयपीएल २०२१मधील मागील सामन्यात शार्दूलनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध त्याच्या अखेरच्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर विकेट्स घेतल्या होत्या आणि आज त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेत एकप्रकारे हॅटट्रिक पूर्ण केली. RCBविरुद्ध त्यानं १७व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स ( १२) व देवदत्त पडिक्कल ( ७०) यांची विकेट घेतली होती. त्या सामन्यात त्यानं ४ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या. आज त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
Web Title: IPL 2021, CSK vs KKR : Shardul Thakur picks three wickets in last 3 balls, today he picks up a wicket on the first ball against KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.