IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai : २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची अवस्था ५ बाद ३१ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर आंद्रे रसेल ( Andre Russell ) मैदानावर आला अन् वादळासारखा घोंगावला. आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत एकही षटकार न खेचणाऱ्या रसेलनं ६ खणखणीत षटकार खेचले. त्यानं २२ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चेंडूंत ४८ धावा ( ३ चौकार व ६ षटकार) आल्या. पण, सॅम कुरणच्या चेंडूवर तो विचित्र पद्धतीनं बाद झाला आणि त्यानंतर वानखेडेच्या पायऱ्यांवर हतबल बसून राहिला. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update
दीपक चहरचा कहर...२२० धावांचे ओझे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना पेलवलं नाही. शुबमन गिल ( ०), नितीश राणा ( ९), कर्णधार इयॉन मॉर्गन (७) व सुनील नरीन ( ४) यांना दीपक चहरनं बाद करून कहर केला. त्यानं ४ षटकांत २९ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या लुंगी एनगिडीनं राहुल त्रिपाठीला बाद करून कोलकाताचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता. पण, विकेट पडल्यानंतरही KKRच्या धावांची गती CSKसाठी चिंताजनक होती. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update
आंद्रे रसेलची आतषबाजी...निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल ही जोडी CSKच्या गोलंदाजांना भिडली. रसेलनं २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पंजाब किंग्सच्या दीपक हुडानं २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. पण, सॅम कुरननं १२ व्या षटकात रसेलची विकेट घेतली. रसेलनं २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. रसेलची ही विकेट KKRसाठी वेदनादायी ठरली. कुरनचा डाव्या बाजूनं जाणार चेंडू सोडणं रसेलला महागात पडलं अन् त्याचा त्रिफळा उडाला.
पाहा व्हिडीओ..
फॅफ ड्यू प्लेसिस ९५ धावांवर नाबाद...महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला.