IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai : ऋतुराज गायकवाडचा ( Ruturaj Gaikwad) फॉर्म परतल्यानं चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) ताफ्यातही सकारात्मक ऊर्जा परतलेली पाहायला मिळाली. आयपीएल २०२१च्या पहिल्या तीन सामन्यांत फक्त २० धावा करणाऱ्या ऋतुराजनं कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह ( Faf du Plessis) पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. या दोघांच्या विक्रमी धावसंख्येवर CSKच्या अन्य फलंदाजांनी मोठा डोलारा उभा केला. फॉर्मात असलेल्या मोईन अलीनंही हात साफ करून घेतले. फॅफच्या खेळीला तोड नव्हता. अखेरची दोन चेंडू शिल्लक असताना फॅफला शतकासाठी सहा धावा हव्या होत्या, परंतु त्याला पाचव्या चेंडूवर एकच धाव करता आली आणि त्याचं शतक हुकलं. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update
मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या खेळात आत्मविश्वास जाणवत होता. ऋतुराज व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५४ धावा चोपून काढताना KKRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कोणताच आक्रसताळेपणा न दाखवता दोन्ही फलंदाजांनी क्रिकेटचे क्लासिक शॉट्स मारून मंत्रमुग्ध केले. ऋतुराजनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. त्यानं फॅफसह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. आयपीएलमध्ये CSKनं २०१३नंतर प्रथमच KKRविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. CSK vs KKR, CSK vs KKR live score
ऋतुराजनं KKRचं कंबरडं मोडल्यानं त्यांच्या गोलंदाजांना काहीच सुचत नव्हते. पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी व प्रसिद्ध कृष्णा यांचा चांगला समाचार घेतला गेला. फॅफनेही त्याचे आयपीएलमधील १७वे अर्धशतक पूर्ण करताना CSKच्या धावांचा वेग कायम राखला. त्यानं फॅफसह दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. सुनील नरीनच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा अलीचा प्रयत्न फसला. त्यानं १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावा कुटल्या. IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. आयपीएलमध्ये ४५००+ धावा नावावर असणाऱ्या धोनीला आयपीएलच्या इतिहासात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर एकही चौकार मारता आलेला नव्हता. धोनीनं फ्री हिटवर हा इतिहास खोडून काढला अन् आयपीएलमध्ये एकूण ६४ चेंडूंनंतर नरीनच्या गोलंदाजीवर पहिला चौकार खेचला. ( Finally MSD hits a boundary off Narine after facing 64 balls in IPL). धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला.
CSK vs KKR Live Score, IPL 2021 CSK vs KKR, CSK vs KKR Live Match
Web Title: IPL 2021, CSK vs KKR T20 Live : Fifty from Ruturaj Gaikwad & Faf du Plessis, CSK posted 220 for 3 from 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.