IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai : आयपीएल २०२०मधील अखेरच्या तीन सामन्यांत सलग अर्धशतक झळकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) १४व्या पर्वात साजेशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या तीन सामन्यांत फक्त २० धावा आणि पर्यायी सलामीवीर म्हणून रॉबीन उथप्पा सारखा अनुभवी खेळाडू, असताना ऋतुराजचं काही खरं नाही असंच वाटत होतं. पण, चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ऋतुराजच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा हा विश्वास ऋतुराजनं आज सार्थ ठरवला. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) यानंही धोनीचं कौतुक केलं. IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update
मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. मोईन अलीनं फॅफसह दुसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. अली १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावांवर बाद झाला. IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आज फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला. धोनी ८ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून १७ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर कर्णधार इयॉन मॉर्गननं अप्रतिम झेल टिपला. फॅफनं अखेरच्या षटकात फटकेबाजी कायम राखताना चेन्नईला २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा करून दिला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला. IPL 2021, IPL 2021 latest news, CSK vs KKR IPL Matches
ऋतुराजच्या दमदार खेळीवर इरफान म्हणाला, तुम्ही खेळत नसाल, तर तुमच्याकडून चांगली कामगिरी होणार नाही, परंतु तुम्हाला सातत्यानं पाठींबा मिळत राहिला तर रिझल्ट नक्की मिळतो.