IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला  

IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : CSKचे सलामीवीर अपयशी ठरले की, संपूर्ण संघ ढेपाळतो... हे आता सर्वांना माहित झालं आहे. मागच्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( DC) चेन्नईची अशीच अवस्था झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:21 PM2021-10-07T17:21:09+5:302021-10-07T17:21:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : Faf du Plessis ( 76 runs) fifty guides Chennai Super Kings to 134/6 in 20 overs | IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला  

IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा 'त्रिफळा' उडाला; चेन्नई सुपर किंग्सचा डोलारा एकट्या फॅफ ड्यू प्लेसिसनं सांभाळला  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Updates : आयपीएलच्या प्ले ऑफमधील स्थान पक्के झाले असले तरी क्वालिफायर १मध्ये स्थान पटकावून दोन संधी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचं ( Punjab Kings) आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानावर उतरला. पण, त्यांच्यावर पंजाबच भारी पडला. CSKचा फॅफ ड्यू प्लेसिस एकटा काय तो खेळला. सहाव्या विकेटसाठी त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली,  

CSKचे सलामीवीर अपयशी ठरले की, संपूर्ण संघ ढेपाळतो... हे आता सर्वांना माहित झालं आहे. मागच्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( DC) चेन्नईची अशीच अवस्था झाली होती. पंजाब किंग्सला प्ले ऑफचं गणित सोडवणं अवघड असलं तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार प्रकर्षानं जाणवला. ऋतुराज गायकवाड ( १२) चुकीचा फटका मारून अर्षदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोईन अली ( ०), सुरेश रैना ( २) व अंबाती रायुडू ( ४) हे झटपट माघारी परतले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आजतरी खेळेल असे वाटले होते, परंतु रवी बिश्नोईनं ( Ravi Bishnoi) त्याला पुन्हा त्रिफळाचीत केले. धोनी १२ धावांवर बाद झाल्यामुळे चेन्नईची अवस्था ५ बाद ६१ अशी झाली होती.


फॅफ ड्यू प्लेसिस दुसऱ्या बाजून संयमी खेळ करताना CSKसाठी आशादायक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यानं ४६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. CSKच्या फलंदाजांची या खेळपट्टीवर झालेली अवस्था पाहून PBKSलाही सहज धावा करता येतील असे वाटत नाही. फॅफला ६व्या विकेटसाठी रवींद्र जडेजाची साथ मिळाली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना CSKला समाधानकारक पल्ला गाठून दिला. यूएईच्या गरमीत दोघंही फलंदाज अक्षरशः दमले होते. फॅफनं ५५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या. चेन्नईनं ६ बाद १३४ धावा केल्या. 
 

Web Title: IPL 2021, CSK vs PBKS Live Updates : Faf du Plessis ( 76 runs) fifty guides Chennai Super Kings to 134/6 in 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.