IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. दुबईच्या स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याची नाणेफेक पंजाब किंग्जनं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. निकोलस पुरन याच्या जागी संघात अष्टपैलू ख्रिस जॉर्डन याला संधी देण्यात आली आहे. तर चेन्नई सुपरकिंग्जनं आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या सामन्यातीलच संघ कायम असणार असल्याचं धोनीनं स्पष्ट केलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्जचा संघ १८ गुणांसह याआधीच प्ले-ऑफसाठी पात्र ठरलेला आहे. पण सामना जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या गुणांची बरोबरी करण्याची संधी चेन्नईकडे आहे. त्याहून पंजाब किंग्ज संघासाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पंजाब किंग्जनं आजचा सामना जिंकल्या तर संघाची एकूण गुणसंख्या १२ होणार आहे. पण असं असलं तरी सध्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स देखील १२ गुणांवर आहेत. त्यामुळे पंजाबला आजचा सामना मोठ्या फरकानं जिंकून गुणतालिकेत झेप घेता येणार आहे. चेन्नई सारख्या तुफान फॉर्मात असलेल्या संघासमोर मोठा विजय प्राप्त करण्याचं खडतर आव्हान पंजाब किंग्जसमोर आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)ऋतूराज गायकवाड, फॅफ ड्यूप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, रॉबीन उथप्पा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड
पंजाब किंग्ज (Punjab Kings)केएल राहुल, मयांक अग्रवाल, मार्करम, ख्रिस जॉर्डन, शाहरुख खान, सरफराज खान, हेन्रिकस, हरप्रित ब्रार, अर्शदिप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी