IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) यानं आत पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings ) फलंदाजांची दैना उडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:00 PM2021-04-16T22:00:44+5:302021-04-16T22:01:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : ‘Ja Ja’ – MS Dhoni brushes off lbw appeal made by Deepak Chahar against PBKS | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) यानं आत पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings ) फलंदाजांची दैना उडवली. चहरनं १३ धावांत ४ विकेट्स घेताना आयपीएलमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. यापूर्वी त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. चहरनं दिलेल्या धक्क्यानंतर पंजाब किंग्सला सावरणं थोडं अवघड गेलं. चहरच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) त्याला, जा जा!; असं बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.  Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स

पंजाबची अवस्था ४ बाद १९ धावा अशी झाली असताना शाहरुख खानला बाद करण्यासाठी चरहनं पायचीतची अपील केली. धोनीला पंजाबचा फलंदाज नाबाद आहे हे माहित होते आणि त्यामुळेच तो यष्टिंमागून 'जा जा' असं ओरडला. दीपक चहरनं पंजाबच्या मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन व दीपक हुडा यांना बाद केले.   IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

पाहा व्हिडीओ..


दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.  

Web Title: IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : ‘Ja Ja’ – MS Dhoni brushes off lbw appeal made by Deepak Chahar against PBKS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.