IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना CSKच्या खेळाडूंनी पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्घ एकजुटीनं खेळ केला. दीपक चहरनं ( ४-१३) PBKS च्या तगड्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज देताना पंजाबला ८ बाद १०६ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले.
IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight
- पहिल्या षटकात मयांक अग्रवालची ( 0) विकेट पडल्यानं पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला. त्याच दीपक चहरच्या त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस गेलला जीवदान मिळाले. पण, यामुळे गेल व लोकेश राहुल यांच्यावर एकप्रकारे मानसिक दडपण निर्माण झाले होते.
- दीपक चहर खेळपट्टीवर अचूक मारा करताना पंजाबच्या फलंदाजांना नाचवत होता, तर दुसरीकडे रवींद्र जडेजा क्षेत्ररक्षणात पुन्हा आपली छाप पाडून गेला. लोकेश राहुलला त्यानं ज्या चपळतेनं धावबाद केलं, तिथेच पंजाबचे मनोबल खचायला सुरूवात झाली. ख्रिस गेलचा टीपलेला अफलातून झेल पंजाबला धक्का देणारा ठरला
- महेंद्रसिंग धोनीनंही पहिल्या सात षटकांत चहरकडून चारही षटकं फेकून घेतली आणि त्यानं त्याचा हा विश्वास सार्थ ठरवला व १ निर्धाव षटकातसह १३ धावांत चार फलंदाज माघारी पाठवून चेन्नईच्या विजयाचा खऱ्या अर्थानं पाया रचला होता.
- रवींद्र जडेजानं गोलंदाजीतही आपली छाप पाडली. मोईन अली व ड्वेन ब्राव्हो या अनुभवी गोलंदाजांनीही कमी धावा देताना पंजाबवरील दडपण वाढवले होते.
- शाहरुख खान व झाय रिचर्डसन यांनी संयमी खेळ करतान हे दडपण कमी केलं. पण, पंजाबकडून अशा आणखी १-२ भागीदारी झाल्या असत्या तर सामना चुरशीचा झाला असता. दीपक चहरनं सुरुवातीलाच दिलेल्या हादऱ्यातून ते सावरले नाही.
- १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून सावध खेळाचीच अपेक्षा होती, पण ऋतुराज गायकवाड घाई करून माघारी परतला. ही विकेट मिळवल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांना CSKवर दडपण निर्माण करण्याची संधी होती.
- मोईन अली व फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबच्या गोलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही. अलीला प्रमोशन देण्याचा डाव यशस्वी ठरला आणि त्यानं त्याची भूमिका चोख बजावताना CSKचा विजय निश्चित केला.
- फॅफ ड्यू प्लेसिस एका बाजूनं अँकरची भूमिका बजावत होता. शमीनं १५व्या षटकात सुरेश रैना व अंबाती रायुडू यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवून सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. सॅम कुरननं विजयी चौकार खेचला.
Web Title: IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : Deepak Chahar stars in Chennai Super Kings' 6-wicket win over Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.