IPL 2021, CSK vs RCB Live : नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूनं, RCB दोन मोठ्या बदलासह उतरणार मैदानावर 

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर भिडण्याआधीच वाळूचं वादळ आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:35 PM2021-09-24T19:35:36+5:302021-09-24T19:39:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs RCB Live Updates: CSK won the toss and decided to bowl first, match starts at 7.45 pm IST,Tim David makes his IPL debut   | IPL 2021, CSK vs RCB Live : नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूनं, RCB दोन मोठ्या बदलासह उतरणार मैदानावर 

IPL 2021, CSK vs RCB Live : नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूनं, RCB दोन मोठ्या बदलासह उतरणार मैदानावर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर भिडण्याआधीच वाळूचं वादळ आलं. त्यामुळे सर्वांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar) आठवण झाली होती. याच वादळात सचिननं ऑस्ट्रेलियाचा पालापाचोळा केला होता. आज CSK vs RCB सामन्यात कोणाचा पालापाचोळा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. दोन्ही संघ IPL PointTable मध्ये टॉप फोरमध्ये असले तरी RCBला आज पुन्हा हरणे परवडणारे नाही. वादळामुळे अर्धातास उशीरानं नाणेफेक करावी लागली. चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


गुणतक्त्यात CSK १२ गुणांसह दुसऱ्या, तर RCB १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्ध RCBला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे विराटचं टेंशन आधीच वाढलं आहे, तर CSKनं पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सवर ( MI) सफाईदार विजय मिळवून दुसऱ्या टप्प्यात चांगली सुरूवात केली आहे.

RCBला देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. KKRविरुद्ध त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना लौकिकानुसार फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज KKRविरुद्ध फारसे प्रभावी ठरले नव्हते. दुसरीकडे CSKचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मुंबईविरुद्ध ५८ चेंडूत शानदार ८८ धावा ठोकल्या. फॅफ ड्यू प्लेसिस आणि मोईन अली यांना खाते उघडण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात जखमी झालेला अंबाती रायुडू आज खेळणार की नाही याची उत्सुकता होती.

चेन्नईच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अंबाती रायुडू आजचा सामना खेळण्यासाठी तंदुरूस्त आहे. बंगलोरच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत.     

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ- विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वनिंदू हसरंगा, टीम डेव्हिड, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल.

Web Title: IPL 2021, CSK vs RCB Live Updates: CSK won the toss and decided to bowl first, match starts at 7.45 pm IST,Tim David makes his IPL debut  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.