Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर भिडण्याआधीच वाळूचं वादळ आलं. त्यामुळे सर्वांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar) आठवण झाली होती. याच वादळात सचिननं ऑस्ट्रेलियाचा पालापाचोळा केला होता. आज CSK vs RCB सामन्यात कोणाचा पालापाचोळा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. दोन्ही संघ IPL PointTable मध्ये टॉप फोरमध्ये असले तरी RCBला आज पुन्हा हरणे परवडणारे नाही. वादळामुळे अर्धातास उशीरानं नाणेफेक करावी लागली. चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RCBला देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. KKRविरुद्ध त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना लौकिकानुसार फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज KKRविरुद्ध फारसे प्रभावी ठरले नव्हते. दुसरीकडे CSKचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने मुंबईविरुद्ध ५८ चेंडूत शानदार ८८ धावा ठोकल्या. फॅफ ड्यू प्लेसिस आणि मोईन अली यांना खाते उघडण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात जखमी झालेला अंबाती रायुडू आज खेळणार की नाही याची उत्सुकता होती.
चेन्नईच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अंबाती रायुडू आजचा सामना खेळण्यासाठी तंदुरूस्त आहे. बंगलोरच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ- विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वनिंदू हसरंगा, टीम डेव्हिड, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल.