IPL 2021, CSK vs RR Live Updates : आपल्या ऋतुराज गायकवाडनं 'मोठा' विक्रम मोडला, अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून पूर्ण केलं शतक

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad ) राजस्थान रॉयल्सच्या ( RR) गोलंदाजांना धु धु धुतलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 09:30 PM2021-10-02T21:30:52+5:302021-10-02T21:35:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs RR Live Updates : Hundred for Ruturaj Gaikwad, 50*(43) to 101*(60) - 51 runs from just 17 balls, CSK 4/189 | IPL 2021, CSK vs RR Live Updates : आपल्या ऋतुराज गायकवाडनं 'मोठा' विक्रम मोडला, अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून पूर्ण केलं शतक

IPL 2021, CSK vs RR Live Updates : आपल्या ऋतुराज गायकवाडनं 'मोठा' विक्रम मोडला, अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून पूर्ण केलं शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad ) राजस्थान रॉयल्सच्या ( RR) गोलंदाजांना धु धु धुतलं. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) प्ले ऑफमध्ये एन्ट्री मिळवल्यानंतर आज ऋतुराज मुक्तपणे खेळला. तो फॉर्मात होताच, पण आज त्यानं हातचे राखून ठेवलेले सर्व फटके मारले. स्ट्रेट ड्राईव्ह, स्कूप, कव्हर ड्राईव्ह, मिड ऑनला षटकार, बैठक षटकार सर्व फटके त्यानं खेचले. रवींद्र जडेजाचा शेवटच्या काही षटकांतील खेळ हा खतरनाक होता. स्टेडियमच्या चहूबाजू त्यानं फटक्यांनी व्यापून टाकल्या. २०व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर ऋतुराजला शतक पूर्ण करण्यासाठी पाच धावा हव्या होत्या अन् त्यानं अखेरच्या चेंडूवर षटकार मारून शतक पूर्ण केलं.

 
फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पुन्हा एकदा CSKला चांगली सुरुवात करून दिली. फॅफनं काही अप्रतिम फटके मारले, परंतु मुश्ताफिजूर रहमान आणि त्याच्यात जबरदस्त टक्कर झाली. फॅफ धाव घेण्याच्या प्रयत्नात रहमानच्या अंगावर जोरात आदळला अन् त्याची मान दुखावली गेली. त्यानंतर राहुल टेवाटियाच्या गोलंदाजीवर फॅफ ( २५) बाद झाला. सुरेश रैनाला आज बढती मिळाली, परंतु त्यालाही ( ३) टेवाटियानं बाद केलं. ऋतुराजनं सातत्य राखताना आयपीएल २०२१मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल २०२१तील मागील ९ डावांपैकी ऋतुराजनं सलग ८व्यांदा ३०+ धावा केल्या.

अर्धशतकानंतर ऋतुराजनं धावांचा वेग वाढवताना टेवाटियाला सलग दोन खणखणीत षटकार खेचले. पण, त्याच षटकात मोईन अलीला आणखी धावा चोपण्याची हाव महागात पडली. अली २१ धावांवर यष्टिचीत झाला. पण, ऋतुराजची भूक काही शमली नाही, त्यानं फटकेबाजी सुरूच ठेवली. ऋतुराज हा CSKकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर ठरला. २००९-१०मध्ये मुरली विजयनं ४४१ धावा केल्या होत्या आणि तो विक्रम ऋतुराजनं मोडला. (  Ruturaj Gaikwad holds the record of scoring most runs as an Indian CSK opener in IPL )  

त्याच्यासोबत रवींद्र जडेजानंही हात धुऊन घेतले. मुस्ताफिजूरला त्यानं बसून मारलेला षटकार खतरनाक होता. पण, त्याच्या या फटकेबाजूनं ऋतुराजचे शतक झळकावण्याचे स्वप्न दूर ढकलले गेले. पण, त्यानं अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केलं. ऋतुराजनं  ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा चोपल्या, तर जडेजानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावा कुटल्या. चेन्नईनं ४ बाद १८९ धावा केल्या. 

Web Title: IPL 2021, CSK vs RR Live Updates : Hundred for Ruturaj Gaikwad, 50*(43) to 101*(60) - 51 runs from just 17 balls, CSK 4/189

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.