Join us  

IPL 2021, CSK vs RR  Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा विक्रमी सामना; राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात पाच मोठे बदल

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : राजस्थानसाठी ही मॅच डू ऑर डाय अशी आहे. उभय संघांमध्ये २४ सामने झालेत आणि चेन्नईनं त्यापैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 7:10 PM

Open in App

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ऐटित प्ले ऑफमध्ये स्थान पक्क केलं आणि आज त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे ( RR) आव्हान आहे. CSKसाठी हा सामना तितका महत्त्वाचा नसला तरी गुणतालिकेत टॉप टूमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे ते याही सामन्यात दमदार कामगिरी करतील. राजस्थानसाठी ही मॅच डू ऑर डाय अशी आहे. उभय संघांमध्ये २४ सामने झालेत आणि चेन्नईनं त्यापैकी १५ मध्ये विजय मिळवला आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. RRनं संघात पाच बदल केले, तर CSK नं दोन. महेंद्रसिंग धोनीचा  कर्णधार म्हणून आयपीएलमधील हा २०० वा सामना आहे. 

  • ड्वेन ब्राव्होला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन गडी बाद करावे लागतील, ट्वेंटी-२० असा पराक्रम करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरेल.
  • ट्वेंटी-२०त अंबाती रायुडूला २०० षटकार पूर्ण करण्यासाठी तीनवेळा चेंडू थेट सीमापार पाठवावा लागणार आहे.
  • मुस्ताफिजूर रहमाननं दोन विकेट घेताच आयपीएल २०२१च्या पर्वात ५०+ विकेट्स पूर्ण करणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल
  • ड्वेन ब्राव्होनं आज तीन विकेट्स घेतल्यास , तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा दुसरा गोलंदाज बनेल
  • दीपक चहरच्या जागी आसीफ आणि ड्वेन ब्राव्होच्या जागी सॅम कुरनचा समावेश केला गेला आहे. 

 चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली,  सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, केएम आसीफ, जोश हेझलवूड ( Chennai Super Kings: 1 Ruturaj Gaikwad, 2 Faf du Plessis, 3 Moeen Ali, 4 Suresh Raina, 5 Ambati Rayudu, 6 MS Dhoni, 7 Ravindra Jadeja, 8 Sam Curran, 9 Shardul Thakur, 10 KM Asif, 11 Josh Hazlewood)राजस्थान रॉयल्स - एव्हिन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, शिबम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड मिलर, राहुल टेवाटिया, मयांक मार्कंडे, चेतन सकारीया, आकाश सिंग, मुस्ताफिजूर रहमान.   

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स
Open in App