ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. RRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या १४व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी पंजाब किंग्सला ( Punjab Kings) ६ विकेट्नं नमवून पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीच्या सामन्यात CSKला दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीर शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी धु धु धुतले होते. IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एकही विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या दीपक चहरनं पंजाब किंग्सचे कंबरडे मोडले. त्यानं मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा व निकोलस पूरन यांना झटपट माघारी पाठवले. शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजा यांना त्या सामन्यांत एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून आज चांगल्या कामगिरीची संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. IPL 2021, IPL 2021 latest news, CSK vs RR IPL Matches
पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबविरुद्ध संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. CSKसाठी ही आनंदाची बातमी आहे. अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांनाही अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. मोईन अलीचा फॉर्म हा संघाच्या फायद्याचा ठरत आहे आणि तिसऱ्या क्रमांकवरील त्याचे स्थान पक्के समजले जात आहे. RRविरुद्धच्या सामन्यात CSKसलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला बाकावर बसवण्याची शक्यता होती, परंतु धोनीनं त्याला संघात कामय ठेवले. दोन्ही संघांनी त्यांच्या अंतिम ११मध्ये कोणताच बदल केलेला नाही. CSK vs RR IPL match 2021, CSK vs RR T20 Match, CSK vs RR Live Score
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ ( CSK's likely playing XI) - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडी, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर ( Chennai Super Kings (Playing XI): Ruturaj Gaikwad, Faf du Plessis, Moeen Ali, Suresh Raina, Ambati Rayudu, Sam Curran, MS Dhoni(w/c), Ravindra Jadeja, Dwayne Bravo, Shardul Thakur, Deepak Chahar)
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ ( RR's likely playing XI ) - मनन वोहरा, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारीया, मुस्ताफिजून रहमान ( Rajasthan Royals (Playing XI): Jos Buttler, Manan Vohra, Sanju Samson(w/c), Shivam Dube, David Miller, Riyan Parag, Rahul Tewatia, Chris Morris, Jaydev Unadkat, Chetan Sakariya, Mustafizur Rahman)
Web Title: IPL 2021, CSK vs RR T20 Live : RR won the toss and elected to field first, Both teams unchanged
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.