ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : ऋतुराज गायकवाडनं मिळालेल्या संधीवर पुन्हा पाणी फिरवले. पण, फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis) सर्वांचे मनोरंजन केलं. जयदेव उनाडकटच्या पाचव्या षटकात फॅफनं दोन अतरंगी फटके मारताना १९ धावा चोपल्या. त्यानं तीन चौकार व एक षटकार खेचले. पण, सहाव्या षटकात ख्रिस मॉरिसनं त्याला बाद केले. फॅफ १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा कुटल्या. IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update
महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. RRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेकीला येताच कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) मोठ्या पराक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) एकाच फ्रँचायझीकडून २००व्या सामन्यात नेतृत्व सांभाळणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. CSKकडून ही त्याची कर्णधार म्हणून २००वी मॅच आहे. १९ एप्रिल २००८ मध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला अन् आज १९ एप्रिल २०२१मध्ये तो २००वा सामना खेळत आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाचे सर्वाधिक नेतृत्व सांभाळणारे कर्णधार महेंद्रसिंग धोनी - २००* चेन्नई सुपर किंग्सविराट कोहली - १२८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोररोहित शर्मा - १२४ मुंबई इंडियन्सगौतम गंभीर - १२४ कोलकाता नाईट रायडर्स
ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला. मुस्ताफिजूर रहमानच्या स्लोव्हर चेंडूवर ऋतुराजनं मारलेला फटका फसला अन् CSKला २५ धावांवर पहिला धक्का बसला. ऋतुराजनं १३ चेंडूंत फक्त १० धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनं CSKवरील दडपण कमी करताना जयदेव उनाडकटनं टाकलेल्या पाचव्या षटकात ४,४,६,४ धावा चोपल्या.