ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आलं. पण या सामन्यात रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) एका कामगिरीमुळे महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) २०१३मध्ये केलेलं ट्विट पुन्हा व्हायरल झाले... टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!
चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांनीही चांगले कमबॅक केले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रवींद्र जडेजा यांच्याकडे ६ षटकं खेळण्यासाठी असतानाही त्यांना समाधानकारक धावा करता आल्या नाहीत. या दोघांनी २१ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेतन सकारियानं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स
जोस बटलर व मनन वोहरा यांनी RRला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३ चेंडूंत ३० धावा जोडल्या, परंतु सॅम कुरननं वोहराला ( १४) माघारी जाण्यास भाग पाडले. शिवम दुबेनं घरच्या मैदानावर CSKचा पाहुणचार घेतला. ४२ धावांची ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात जडेजानं RRचा सेट फलंदाज दुबेलाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले. १५व्या षटकात मोईन अलीनं आणखी दोन धक्के देत CSKचा विजय पक्का केला. राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या. T20 World Cup 2021 : टीम इंडिया दोन संघ मैदानावर उतरवण्यास तयार; प्रत्येक खेळाडूमागे तगडा पर्याय!
या सामन्यात जडेजानं चार सुरेख झेल टिपले आणि सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीचं २०१३सालचं ट्विट व्हायरल झालं. त्यात धोनीनं म्हटलं होतं की,''सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, परंतु चेंडूच त्यांचा शोध घेतो आणि त्यांच्या हातात झेपावतो.''
Web Title: IPL 2021, CSK vs RR T20 : Ravindra Jadeja 4 catches against RR, MS Dhoni 8 years old tweet goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.