ipl 2021 t20 CSK Vs SRH live match score updates Delhi : मनीष पांडेचं दणक्यात पुनरागमन अन् कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) मोठी धावसंख्या उभारली. जॉनी बेअरस्टो ७ धावांवर माघारी परतल्यानंतर मनीष व वॉर्नर यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. आयपीएलमध्ये अर्धशतकाचे अर्धशतक साजरा करणारा वॉर्नर हा पहिलाच फलंदाज ठरला. याशिवाय त्यानं आजच्या सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली. केन विलियम्सननं अखेरच्या षटकातं जोरदार फटकेबाजी करताना SRHला मोठी धावसंख्या उभारून दिली. IPL 2021 : CSK Vs SRH T20 Live Score Update
सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् त्यांना पहिल्याच षटकात महेंद्रसिंग धोनीकडून जीवदान मिळाले. दीपक चहरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोचा सोपा झेल धोनीनं सोडला. पण, सॅम कुरननं धोनीच्या या चुकीची भरपाई केली. त्यानं चौथ्या षटकात SRHला पहिला धक्का दिला. जॉनी बेअरस्टोनं टोलावलेला उत्तुंग चेंडू दीपक चहरनं सुरेखरित्या टिपला अन् बेअरस्टोला ७ धावांवर माघारी जावं लागले. अपयशी ठरत असलेल्या मनीष पांडेचे आजच्या सामन्यात पुनरागमन झाले अन् त्यानं दुसऱ्या विकेटसाठी वॉर्नरसह अर्धशतकी भागीदारी केली. मनीषचा परतलेला फॉर्म हा SRHसाठी शूभसंकेत म्हणावा लागेल.IPL 2021, IPL 2021 latest news, CSK Vs SRH IPL Matches
केन विलियम्सनं याला चौथ्या क्रमांकावर ठेवून धावांची गती वाढवण्यासाठी मनीषला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय योग्य ठरला. वॉर्नरचे फटके आज अचूक बसत नव्हते. मनीषनं ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. SRHच्या १४व्या षटकांत १ बाद १०२ धावा झाल्या होत्या. वॉर्नरच्या बॅट चेंडूशी कनेक्ट होत नव्हती. त्यानं ५० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि आयपीएलमध्ये ५० अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. ( David Warner scores his 50th IPL fifty) या अर्धशतकासह त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार केला. ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड व शोएब मलिक यांच्यानंतर ट्वेंटी-२०त दहा हजार धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. शिवाय आयपीएलमध्ये त्यानं २०० षटकारही पूर्ण केले. CSK Vs SRH T20 Match, CSK Vs SRH Live Score
१८व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर वॉर्नर झेलबाद झाला. त्यानं ५५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. वॉर्नर व मनीष यांनी ८७ चेंडूंत १०६ धावा जोडल्या. त्याच षटकात SRHचा सेट फलंदाज मनीष पांडेही बाद झाला. फॅफ ड्यू प्लेसिसनं अप्रतिम झेल घेत ४६ चेंडूंत ६१ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करणाऱ्या मनीषला माघारी जाण्यास भाग पाडले. शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १९व्या षटकात केन विलियम्सननं २० धावा चोपल्या. अखेरच्या षटकात १३ धावा आल्या. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादनं ३ बाद १७१ धावा केल्या. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match
Web Title: IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : David Warner becoming the first batsman to register 50 half-centuries in IPL, SRH 171/3
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.