IPL 2021: आयपीएलचं सध्या १४ वं सीझन सुरू आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाची कामगिरी अद्याप लौकिकाला साजेशी होऊ शकली नसली तरी गेल्या सामन्यात विजय प्राप्त करुन संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या एका युवा भारतीय गोलंदाजानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शिवम मावी या भारतीय युवा गोलंदाजानं गेल्या वर्षी आणि यंदाच्या सीझनमध्येही स्वत:ची योग्यता सिद्ध करुन दाखवत आहे.
जेव्हा एखादा खेळाडू तुम्हाला आदर्शन मानत असल्याचं म्हणतो तेव्हा तो क्षण अतिशय महत्वाचा असतो. 'ईएनपीएन क्रिकइन्फो'नं आयोजित केलेल्या 'टी-२० टाइम आऊट' या लाइव्ह कार्यक्रमात एक असाच हळवा क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमात द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि समालोचक आकाश चोप्रा हे क्रिकेट तज्ज्ञ म्हणून सामील झाले होते. यावेळी लाइव्ह शोमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा गोलंदाज शिवम मावी यानं डेल स्टेन याला आपला आदर्श खेळाडू असल्याचं म्हटलं. (ipl 2021 dale steyn breaks live show shivam mavi calls idol)मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका
"मी जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासूनच डेल स्टेनला फॉलो करत आलो आहे. मला स्टेनकडून अचून टप्प्यात मारा कसा करायचा हे शिकायचं आहे. मी जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनाही फॉलो करतो. पण डेल स्टेन माझ्यासाठी आदर्श आहेत", असं शिवम मावी म्हणाला.
IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान
शिवम मावीचे शब्द ऐकून डेल स्टेन लाइव्ह कार्यक्रमातच भावूक झालेला पाहायला मिळाला. ''मावीनं व्यक्त केलेल्या भावनांमुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. जगाच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर आपण इतका प्रभाव पाडू शकू असं मला कधीच वाटलं नव्हतं'', असं डेल स्टेन म्हणाला. खेळात सातत्य राखणं आवडत असल्याचं यावेळी स्टेनने म्हटलं आणि मावीनंही अशाच प्रकारे चांगली कामगिरी ठेवली तर लवकरच भारतीय संघाकडून खेळताना तो आपल्याला दिसेल, असंही डेल स्टेन यानं यावेळी म्हटलं.
IPL 2021: भारतात कोरोनाचा विस्फोट! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी घेतला महत्वाचा निर्णय
शिवम मावीसोबत संपर्कात राहणं देखील आवडेल असं स्टेननं सांगितलं. "माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे. मी खोटं बोलणार नाही, पण शिवम मावीनं माझ्या डोळ्यांत अश्रू आणले. क्रिकेट खेळताना मी कधीच अपेक्षा केली नव्हती की आपण लोकांवर प्रभाव पाडू शकू. मी अजूनही खेळतोय आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. मला आजही खेळायला आवडतं", असं डेल स्टेन म्हणाला.