IPL 2021: मालदीवमधील बारमध्ये 'झिंगाट' होऊन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात धक्काबुक्की?, नेमकं काय घडलं?

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकेल स्लेटर यांच्यात मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्की झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:00 PM2021-05-09T14:00:23+5:302021-05-09T14:00:57+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 david warner and michael slater physical brawl in the maldives | IPL 2021: मालदीवमधील बारमध्ये 'झिंगाट' होऊन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात धक्काबुक्की?, नेमकं काय घडलं?

IPL 2021: मालदीवमधील बारमध्ये 'झिंगाट' होऊन वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात धक्काबुक्की?, नेमकं काय घडलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकेल स्लेटर यांच्यात मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्की झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा पुढील काही दिवसांचा मुक्काम मालदीवमध्ये असणार आहे. चारच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक मालदीवमध्ये पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियानं प्रवासी विमानांचे निर्बंध हटवल्यानंतर ते मायदेशी रवाना होणार आहेत. दरम्यान काल रात्री एका बारमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचं दोघांनीही म्हटलं आहे. (ipl 2021 david warner and michael slater physical brawl in the maldives)

नेमकं काय घडलं?
आयपीएलचं यंदाचं पर्व संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आल्यानं अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियानं भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये समाविष्ट असलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक यांना सध्या मालदीवमध्ये नेण्यात आलं आहे. मालदीवच्या ताज कोरल या आलिशान रिसॉर्टमध्ये सर्वांचा मुक्काम असणार आहे. याच रिसॉर्टमध्ये मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि मायकल स्लेटर यांच्यात शुल्लक कारणावरुन धक्काबुक्की झाल्याचं वृत्त डेली टेलिग्राफनं प्रसिद्ध केलं आहे. 

दोघांनीही वृत्त फेटाळलं
डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल स्लेटर यांच्या धक्काबुक्की झाल्याचं वृत्त समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होताच दोघांनीही याची दखल घेऊन संबंधित वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ''आमच्या दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्यचं वृत्त काही माध्यमांमध्ये चालवलं जात आहे. पण असा कुठलाही प्रकार आमच्याक घडलेला नाही. मीडियाला अशा बातम्या मूळात कुठून मिळतात माहित नाही. आपण काही पाहिलं नसेल किंवा त्याचा काही पुरावा नसेल तर आपण असं कसं छापू शकतो?", असा सवाल उपस्थित करत डेव्हिड वॉर्नरनं धक्काबुक्कीचं वृत्त फेटाळलं आहे. 

दुसरीकडे मायकेल स्लेटर यांनीही डेव्हिडसोबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. उलट आम्ही चांगले मित्र आहोत. आमच्याक कोणतंही भांडण होणं शक्यच नाही, असं म्हटलं आहे. 
 

Web Title: ipl 2021 david warner and michael slater physical brawl in the maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.