हैदराबाद - २०२१ च्या आयपीएलसाठी नुकतीच लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (IPL 2021) दरम्यान, या लिलावानंतर हैदराबादमध्ये एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad ) फ्रँचायझीवर टीका होत आहे. (TRS MLA Danam Nagender ) दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ("David Warner involved in fixing, remove him from Hyderabad captaincy" )तेलंगाणामधील सत्ताधारी असलेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी डेव्हिड वॉर्नरवर फिक्सिंगचा आरोप केला आहे. डेव्हिड वॉर्नरवर बॉल टेम्परिंगचा आरोप झाला होता. त्यामुळे वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी दानम नागेंद्र यांनी केली आहे.दानम नागेंद्र यांनी २०२१ च्या लिलावात स्थानिक खेळाडूंची निवड न झाल्याने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात हैदराबादमधील स्थानिक खेळाडूंचा समावेश करावा, अन्यथा संघाच्या नावामधून हैदराबादते नाव काढून टाकावे, असा इशारा नागेंद्र यांनी दिला आहे.नागेंद्र म्हणाले की, जर हैदराबादच्या संघात स्थानिक खेळाडूंना घेतले गेले नाही तर जेव्हा हैदराबादमध्ये आयपीएलचे सामने होतील तेव्हा ते आणि त्यांचे समर्थक या सामन्यांना विरोध करतील. आयपीएलच्या अन्य संघात त्या त्या भागातील स्थानिक खेळाडू असतात. मात्र हैदराबादमध्ये अनेक गुणवान खेळाडू असूनही एकालाही फ्रँचायझीने संघात घेतलेले नाही.डेव्हिड वॉर्नरने हैदराबादच्या संघाकडून धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र २०१७ मध्ये बॉल टेम्परिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे २०१८ मध्ये केन विल्यमसनने हैदराबादचे नेतृत्व केले होते. पुढे २०१९ मध्ये वॉर्नरने जोरदार पुनरागमन करत १२ सामन्यात ६९२ धावा कुटल्या होत्या. २०२० मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी करत संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2021 : "डेव्हिड वॉर्नरचा फिक्सिंगमध्ये सहभाग, त्याला हैदराबादच्या कर्णधारपदावरून हटवा"
IPL 2021 : "डेव्हिड वॉर्नरचा फिक्सिंगमध्ये सहभाग, त्याला हैदराबादच्या कर्णधारपदावरून हटवा"
remove David Warner from Sunrisers Hyderabad captaincy, TRS MLA Demands
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 5:34 PM