IPL 2021, DC vs PBKS T20 Live : स्टीव्ह स्मिथचे पदार्पण, दिल्ली कॅपिटल्सने केले मोठे बदल; पंजाब किंग्सनं नाणेफेक गमावली

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbaiगुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) आज सातव्या क्रमांकावरील पंजाब किंग्सशी ( PBKS) सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 07:04 PM2021-04-18T19:04:19+5:302021-04-18T19:09:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 DC vs PBKS Live T20 Score : Steve Smith and Lukman Meriwala are making their DC debut, Delhi Capitals won the toss  | IPL 2021, DC vs PBKS T20 Live : स्टीव्ह स्मिथचे पदार्पण, दिल्ली कॅपिटल्सने केले मोठे बदल; पंजाब किंग्सनं नाणेफेक गमावली

IPL 2021, DC vs PBKS T20 Live : स्टीव्ह स्मिथचे पदार्पण, दिल्ली कॅपिटल्सने केले मोठे बदल; पंजाब किंग्सनं नाणेफेक गमावली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) आज सातव्या क्रमांकावरील पंजाब किंग्सशी ( PBKS) सामना होणार आहे. या दोन्ही संघांना वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दोन सामन्यांपैकी एकात विजय मिळवता आला आहे. दिल्लीनं चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून दणक्यात सुरुवात केली, परंतु राजस्थान रॉयल्सकडून त्यांना हार मानावी लागली. दुसरीकडे पंजाब किंग्सनं पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर थरारक विजय मिळवला, परंतु चेन्नईनं त्यांना सहज पराभूत केले. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.  IPL 2021, DC vs PBKS T20 Live Score Update

दिल्लीचा प्रमुख गोलंदाज अॅनरिच नॉर्ट्जेला संधी मिळण्याची शक्यता होती, परंतु टॉम कुरनच्या जागी स्टीव्ही स्मिथला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे त्याला  दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याच्या नावावर आयपीएल २०२०त २२ विकेट्स होत्या. पंजाबच्या संघात एक बदल पाहायला मिळाला. मयांक अग्रवालला दोन्ही सामन्यात अपयश आले असले तरी त्याला आणखी एक संधी मिळेल. मयांक व लोकेश राहुल यांनी मागच्या पर्वात दमदार कामगिरी केली होती.  

PBKS vs DC
पंजाब व दिल्ली यांच्यात झालेल्या २६ सामन्यांत जय-पराजयाचे पारडे हे पंजाबच्या बाजूनं १५-११ असे आहे. आयपीएल २०२०त दोन्ही संघांनी प्रत्येक १-१सामना जिंकला होता.  वीरेंद्र सेहवागनं या दोन्ही संघाचे नेतृत्व सांभाळले आहे आणि तो सर्वाधिक ३३० धावा करणारा फलंदाज आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये लोकेश राहुलनं दिल्लीविरुद्ध १३७ धावा केल्या, तर शिखर धवननं पंजाबविरुद्ध २०० धावा केल्या आहेत. संदीप शर्मानं  सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या आहेत, तर मोहम्मद शमी व अमित मिश्राच्या नावावर प्रत्येकी ८ विकेट्स आहेत. 
 
पंजाबकडून जलाज सक्सेनानं पदार्पण
दिल्लीनं स्टीव्ह स्मिथ व लुकमन मेरीवाल यांना दिली संधी


 

पंजाब किंग्स ( Punjab Kings) - मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पुरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, जलाज सक्सेना, मोहम्मद शमी, रिले मेरेडीथ, अर्षदीप सिंग  

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीवन स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, लुकमन मेरीवाल 

 

Web Title: IPL 2021 DC vs PBKS Live T20 Score : Steve Smith and Lukman Meriwala are making their DC debut, Delhi Capitals won the toss 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.