IPL 2021: "आमची धावसंख्या चांगलीच होती, पण..."; लोकेश राहुलनं व्यक्त केली निराशा

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार फलंदाजी केल्यानंतरही पंजाब किंग्सला रविवारी निराशाजनक पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:03 PM2021-04-19T17:03:36+5:302021-04-19T17:08:28+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 dc vs pbks match kl rahul says we were 20 runs short | IPL 2021: "आमची धावसंख्या चांगलीच होती, पण..."; लोकेश राहुलनं व्यक्त केली निराशा

IPL 2021: "आमची धावसंख्या चांगलीच होती, पण..."; लोकेश राहुलनं व्यक्त केली निराशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार फलंदाजी केल्यानंतरही पंजाब किंग्सला रविवारी निराशाजनक पराभव पत्करावा लागला. यामुळेच निराश झालेला कर्णधार लोकेश राहुलने म्हटले की, ‘फलंदाजी करताना आम्हाला १९६ धावांचे लक्ष्य चांगले वाटले होते, मात्र आम्ही बहुतेक १०-१५ धावा कमी केल्या.’

बेन स्टोक्सनं घेतला सुनील गावसकरांशी पंगा; कॉमेंट्रीची उडवली खिल्ली, काय म्हणाला पाहा...

मयांक अग्रवाल आणि राहुल यांनी जबरदस्त फटकेबाजी करतान १२२ धावांची सलामी देत पंजाबच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला होता. मात्र, या दोघांचा अपवाद वगळता इतरांना फारशी चमक दाखवता न आल्याने पंजाबला दोनशेचा पल्ला पार करण्यात यश आले नाही. यानंतर दिल्लीने शिखर धवनच्या ९२ धावांच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर सहजपणे विजय मिळवतन पंजाबचा ६ गड्यांनी पराभव केला. (ipl 2021 dc vs pbks match kl rahul says we were 20 runs short)

पांड्या बंधुंच्या स्वॅगला तोड नाही!, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

यानंतर निराश झालेला पंजाबचा कर्णधार राहुल म्हणाला की, ‘फलंदाजी करत असताना १९६ धावांचे दिलेले लक्ष्य मजबूत वाटत होते. मात्र, अखेरच्या षटकांमधील खेळावर लक्ष दिल्यास कळेल की, आम्ही १०-१५ धावा कमीच केल्या. मयांक आणि मी सुरुवातीला विचार केला होता की, १८०-१९० चा स्कोअर शानदार ठरेल. मात्र, नक्कीच वानखेडे स्टेडियमवर दवाचा परिणाम होतो आणि धवनला त्याच्या खेळीचे श्रेय द्यावेच लागेल.’    
राहुल पुढे म्हणाला की, ‘दवामुळे अनेक गोष्टी कठीण झाल्या. वानखेडेवर गोलंदाजी करणे नेहमी आव्हानात्मक ठरते. आम्ही नेहमीच अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र परिस्थितीनुसार खेळ कठीण होऊन जातो.’ 
 

Web Title: ipl 2021 dc vs pbks match kl rahul says we were 20 runs short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.