IPL 2021, DC vs PBKS T20 Live : शिखर धवनला पुन्हा शतकाची हुलकावणी, पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत घेतलीय आघाडी

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 10:53 PM2021-04-18T22:53:08+5:302021-04-18T22:53:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, DC vs PBKS T20 Live: Shikhar Dhawan misses another century, but he is now the orange cap holder of IPL 2021 | IPL 2021, DC vs PBKS T20 Live : शिखर धवनला पुन्हा शतकाची हुलकावणी, पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत घेतलीय आघाडी

IPL 2021, DC vs PBKS T20 Live : शिखर धवनला पुन्हा शतकाची हुलकावणी, पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत घेतलीय आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉ आज आक्रमक मूडमध्ये होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, शिखर धवननं ही उणीव भरून काढली. त्यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याला ८५ धावांवर माघारी परतावे लागले होते. पण, आज तो शतक पूर्ण करेल असेच वाटत होते, परंतु १५व्या षटकात त्याची विकेट पडली. झाय रिचर्डसननं त्याला माघारी पाठवले. शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला.  IPL 2021, DC vs PBKS T20 Live Score Update 

पृथ्वी शॉ - शिखऱ धवनची फटकेबाजी
दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनीही चांगली सुरूवात केली. पृथ्वी आज चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि त्यानं काही सुरेख फटकेही मारले. पण, अर्षदीप सिंहनं DCला पहिला धक्का बसला. पृथ्वी १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला आणि शिखरसोबतची त्याची ५९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. DCकडून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला ( ९) फार कमाल दाखवता आली नाही. या दोघांनी ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली, परंतु त्यात धवनच्याच धावा जास्त होत्या. ipl 2021 t20 DC vs PBKS live match score updates Mumbai

रिषभ पंत आला अन् DCनं गिअर बदलला...
कर्णधार रिषभ पंत येताच दिल्लीनं धावांचा वेग वाढवला. चौकार-षटकारांची बरसात होऊ लागली आणि त्यात शिखर धवननं आयपीएल २०२१तील त्याच्या पहिल्या शतकाची नोंद करता आली असती. संजू सॅमसन ( ११९) याच्यानंतर आयपीएल २०२१त शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरणार होता. पण, त्याचे शतक पुन्हा हुकले. 

मयांक-लोकेश यांची विक्रमी भागीदारी...
मागील दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) आज कमाल केली. त्यानं आणि लोकेश राहुल या दोघांनी अर्धशतकी खेळी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली.दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) कर्णधार रिषभ पंत याचे सर्व डावपेच हाणून पाडताना मयांकनं समोर येईल त्या गोलंदाजाची धुलाई केली.  मयांक ३६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारासह ६९ धावांवर माघारी परतला. मयांक व लोकेश राहुलनं पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची केलेली भागीदारी ही आयपीएलमधील पंजाब किंग्सकडून सलामीवीरांची पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली.  ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai

तळाच्या फलंदाजांनी केलं निराश...
लोकेश ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. दीपक हुडानं पहिलाच चेंडू सीमापार टोलावून त्याचा इरादा स्पष्ट केला. ख्रिस गेल ( ११) धावांवर माघारी परतला. निकोलस पुरन ( ९) आजही काही खास करू शकला नाही.  पंजाब किंग्सला ४ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. दीपक हुडा २२ (१३ चेंडू) व शाहरुख खान १५ ( ५ चेंडू) धावांवर नाबाद राहिले. 
 

Web Title: IPL 2021, DC vs PBKS T20 Live: Shikhar Dhawan misses another century, but he is now the orange cap holder of IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.