Join us  

IPL 2021, DC vs PBKS T20 Match Highlight : ख्रिस गेलचे अपयश, मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी अन् शिखर धवनची सुसाट फलंदाजी

पंजाब किंग्सचे ४ बाद १९५ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सनं १८.२ षटकांत ४ बाद १९४ धावा करून सहज पार केले. १९५ धावांचा डोंगर उभा करूनही पंजाबला हार मानावी लागली, कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याचे अपयश.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:02 AM

Open in App

पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉ आज आक्रमक मूडमध्ये होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, शिखर धवननं ही उणीव भरून काढली. त्यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. पण, त्यानं दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता. दिल्लीनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आगेकूच केली. पंजाब किंग्सचे ४ बाद १९५ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सनं १८.२ षटकांत ४ बाद १९८ धावा करून सहज पार केले. १९५ धावांचा डोंगर उभा करूनही पंजाबला हार मानावी लागली, कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याचे अपयश.

IPL 2021, DC vs PBKS T20 Match Highlight :

  • मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) आणि लोकेश राहुल या दोघांनी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. मयांक ३६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारासह ६९ धावांवर माघारी परतला.  लोकेश ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. 
  • दीपक हुडानं पहिलाच चेंडू सीमापार टोलावून त्याचा इरादा स्पष्ट केला. ख्रिस गेल ( ११) धावांवर माघारी परतला. निकोलस पुरन ( ९) आजही काही खास करू शकला नाही.  पंजाब किंग्सला ४ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. दीपक हुडा २२ (१३ चेंडू) व शाहरुख खान १५ ( ५ चेंडू) धावांवर नाबाद राहिले.  
  • लोकेश बाद झाला तेव्हा पंजाबच्या १५.२ षटकांत १४१ धावा झाल्या होत्या. अखेरच्या चार षटकांत पंजाबच्या फलंदाजांना नुसती फटकेबाजीच करायची होती, परंतु गेल व पूरन यांनी निराश केलं. पंजाबला १०-१५ धावा कमी पडल्या याची कबुली कर्णधार लोकेशनं सामन्यानंतर दिली. 
  • दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनीही चांगली सुरूवात केली. पृथ्वी आज चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि त्यानं काही सुरेख फटकेही मारले. पण, अर्षदीप सिंहनं DCला पहिला धक्का बसला. पृथ्वी १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला आणि शिखरसोबतची त्याची ५९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 
  • DCकडून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला ( ९) फार कमाल दाखवता आली नाही. या दोघांनी ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली, परंतु त्यात धवनच्याच धावा जास्त होत्या. कर्णधार रिषभ पंत येताच दिल्लीनं धावांचा वेग वाढवला. चौकार-षटकारांची बरसात होऊ लागली. पण, त्याचे शतक पुन्हा हुकले. 
  • धवन बाद झाला तेव्हा ३१ चेंडूंत ४३ धावांची गरज होती. इथूनही सामना फिरवता आला असता, पण विकेट टेकर गोलंदाज नसल्यानं पंजाबला पराभव पत्करावा लागला. त्यात मोहम्मद शमीनं टाकलेल्या १७व्या षटकात स्टॉयनिसनं फ्री हिटचा फायदा उचलताना २० धावा चोपल्या. 
  • १८ चेंडूंत १६ धावांची गरज असताना रिषभ पंत ( १५) झेलबाद झाला. दीपक हुडानं सीमारेषेनजीक त्याचा झेल टिपला. ही कॅच पकडताना त्याचा जवळपास पाच प्रयत्न करावे लागले. १८व्या षटकात ललित यादवचा कॅच शमीला जज करता आला नाही आणि त्याचा झेल सूटला. दिल्लीन ६ विकेट्स व १० चेंडू राखून सामना जिंकला. दिल्लीनं ४ बाद १९८ धावा केल्या. स्टॉयनीस १३ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला. 
  • मोहम्म्मद शमीनं ४ षटकांत ५३ धावा दिल्या. झाय रिचर्डसनन ४ षटकांत ४१ धावांत २ विकेट्स घेतल्या. रिली मेरेडीथ हा संघाची डोकेदुखी ठरत आहे, कोट्यवधी रुपये मोजूनही त्याला साजेशी कामगिरी करता येत नाहीय. त्यानं २.२ षटकांत ३५ धावांत १ विकेट घेतली. अर्षदीप सिंह ( ३-०-२२-१) पुन्हा प्रभावी ठरला. 
टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्सआयपीएल २०२१पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्स