IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या तगड्या फलंदाजांना जखडून ठेवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७) यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली.
युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवून मोठा धक्का दिला. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर माघारी परतले. कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रिषभ-श्रेयस यांनी ६२ धावांची भागीदारी केली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु रहमाननं चतुराईनं त्याची विकेट घेतली. दिल्लीनं ६ बाद १५४ धावा केल्या.
यष्टीरक्षक संजू सॅमसन यानं चपळाईनं अय्यरला यष्टीचीत केलं आणि त्यानं जलद वेगानं बेल्स उडवल्यानं मैदानावरील अम्पायरला तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागावी लागली. ( Sanju Samson does MS Dhoni to dismiss Shreyas Iyer) यावेळी तिसऱ्या अम्पायरनं मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर अय्यरच्या विकेटचा रिप्ले प्ले करण्याएवजी रिषभ पंतच्या LBWचा रिप्ले लावला अन् सोशल मीडियावर ही चूक पकडली गेली. अम्पायरनं ही चूक सुधारली, पण तोपर्यंत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.
Web Title: IPL 2021, DC vs RR Live Updates : 3rd umpire first showed rishabh pant's LBW review on screen while reviewing Shreyas iyer's stump out and later corrected it
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.