IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या तगड्या फलंदाजांना जखडून ठेवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७) यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली.
Video: याला दुर्दैव म्हणावं नाहीतर काय?; शिखर धवन झाला विचित्र पद्धतीनं बाद
युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवून मोठा धक्का दिला. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर माघारी परतले. कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रिषभ-श्रेयस यांनी ६२ धावांची भागीदारी केली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु रहमाननं चतुराईनं त्याची विकेट घेतली. दिल्लीनं ६ बाद १५४ धावा केल्या.