Join us  

IPL 2021, DC vs RR Live Updates : आर अश्विनची विक्रमाला गवसणी अन् रिषभ पंतचे १७ सप्टेंबरचं ट्विट व्हायरल  

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 6:28 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लाएम लिव्हिंगस्टोन ( १), यशस्वी जैस्वाल ( ५)  व डेव्हिड मिलर ( ७) हे धावफलकावर १७ धावा असताना माघारी परतले. मिलरची विकेट घेऊन आर अश्विननं ( R Ashwin) ट्वेंटी-२०तील एका विक्रमाला गवसणी घातली अन् रिषभ पंतचे जुने ट्विट व्हायरल झाले. 

राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या तगड्या फलंदाजांना जखडून ठेवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७)  यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली.  

राईट हँडर श्रेयस अय्यर झाला डावखुरा; तिसऱ्या अम्पायरची चूक नेटिझन्सनी पकडली अन्...

युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवून मोठा धक्का दिला. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर माघारी परतले. कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रिषभ-श्रेयस यांनी ६२ धावांची भागीदारी केली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर  अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु रहमाननं चतुराईनं त्याची विकेट घेतली. दिल्लीनं ६ बाद १५४ धावा केल्या. 

आवेश खाननं पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का देताना लिव्हिंगस्टोनला यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केलं. त्यानंतर अॅनरीच नॉर्ट्जेनं जैस्वालची विकेट घेतली. लगेच DCनं आर अश्विनला बोलावले अन् त्यानं पहिल्याच षटकात मिलरची विकेट घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. आतापर्यंत फक्त तीन भारतीय गोलंदाजांना ही कामगिरी करता आली आहे.  अमित मिश्रा व पियूष चावला यांच्या नावावर प्रत्येकी २६२ विकेट्स आहेत आणि या क्लबमध्ये अश्विन ( २५०*) आला आहे. हरभजन सिंग ( २३५) व युझवेंद्र चहल ( २२९) हे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

रिषभचे ट्विट व्हायरल

 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सआर अश्विनरिषभ पंत
Open in App