दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. या सामन्यानंतर RRचा कर्णधार संजू सॅमसन यानंही त्यांचं नेमकं कुठं चुकलं हे मान्य केलं आणि तेच दिल्लीच्या पथ्यावर पडलं. दिल्ली कॅपिटल्सनं ३३ धावांनी हा सामना जिंकला. पराभवानंतर राजस्थानला आणखी एख धक्का बसला आणि कर्णधार संजू सॅमसनसह संघातील सर्व खेळाडूंना शिक्षेचा सामना करावा लागला.
IPLला टक्कर देण्यासाठी रमीझ राजा यांनी तयार केला मास्टर प्लान; PSLवर पाडणार पैशांचा पाऊस
सामन्यात नेमकं काय घडलं?राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांना २१ धावांवर माघारी पाठवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७) यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा केल्या.
राईट हँडर श्रेयस अय्यर झाला डावखुरा; तिसऱ्या अम्पायरची चूक नेटिझन्सनी पकडली अन्...
दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लाएम लिव्हिंगस्टोन ( १), यशस्वी जैस्वाल ( ५) व डेव्हिड मिलर ( ७) हे धावफलकावर १७ धावा असताना माघारी परतले. इथेच राजस्थानवरील दडपण वाढत गेले. त्याचे दडपण थेट मधल्या फळीवर पडले आणि त्यानंतर RRला सावरता आले नाही. महिपाल लोम्रोर काही काळ कर्णधार संजू सॅमसनसोबत खेळपट्टीवर चिकटला होता, परंतु कागिसो रबाडानं त्याची ( १९) विकेट घेतली. रियान पराग व राहुल टेवाटिया यांनी कर्णधाराला साथ दिली नाही. संजू सॅमसन एकटाच खिंड लढवत राहिला. सॅमसन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानला ६ बाद १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
Video: याला दुर्दैव म्हणावं नाहीतर काय?; शिखर धवन झाला विचित्र पद्धतीनं बाद संजू सॅमसनला भरावा लागला २४ लाखांचा दंडदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कर्णधार संजू सॅमसलना दुसऱ्यांदा या कारवाईचा सामना करावा लागला आणि यावेळी त्याला १२ ऐवजी २४ लाखांचा दंड भरावा लागला आहे. ( The Rajasthan Royals have been fined after they maintained a slow over rate during match against Delhi Capitals) RRच्या प्लेईंग इलेव्हमधील अन्य खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख किंवा २५ टक्के मॅच फी रक्कम यापैकी जी कमी असेल ती भरावी लागणार आहे. यापुढील सामन्यात RR षटकांची मर्यादा कायम राखण्यात अपयशी ठरल्यास संजू सॅमसनला एका सामन्याच्या बंदीची शिक्षा होऊ शकते.