IPL 2021, DC vs SRH: सनरायजर्स हैदराबादनं दिलेलं १३६ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १३ चेंडू आणि ८ विकेट्स ठेवून गाठलं. दिल्लीचा संघ या विजयासह पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवन यानं ३७ चेंडूत ४२ धावांची, तर दुखापतीवर मात करुन संघात परतलेल्या श्रेयस अय्यरनं नाबाद ४१ चेंडूत ४७ धावा केल्या आणि कर्णधार रिषभ पंत ३५ धावांवर नाबाद राहिला.
बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video
सनरायझर्स हैदराबादकडून राशीद खान आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. खलील अहमदनं विकेट मिळवली असली तरी त्याच्या ४ षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी ३३ धावा कुटल्या.
कोरोनामुळे आयपीएल पुन्हा स्थगित झाली तर काय होईल? नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया...
दरम्यान, हैदराबादच्या डावात दिल्लीच्या एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांनी आपल्या वेगवान अस्त्रानं हैदराबदाच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं. कगिसो रबाडानं तीन, तर नॉर्खियानं दोन फलंदाजांना बाद केलं. यासोबत अक्षर पटेलनं आपल्या फिरकीची जादू दाखवत २ फलंदाजांना माघारी धाडलं.
सामन्याची नाणेफेक जिंकून हैदराबादनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्खिया यानं वायुवेगानं गोलंदाजी करत यंदाच्या आयपीएलमधला सर्वात वेगवान चेंडू टाकला. याच षटकात विस्फोटक डेव्हिड वॉर्नर याला शून्यावर बाद करत नॉर्खियानं हैदराबादला मोठा धक्का दिला. वृद्धीमान सहा आणि केन विल्यमसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण चांगली भागीदारी रचण्यात अपयश आलं. हैदराबादकडून आज एकाही फलंदाजाला वैयक्तिक ३० धावा देखील करता आल्या नाहीत. अब्दुल समद यानं सर्वाधिक २८ धावा केल्या. तर राशिद खान यानं २२ धावांचं योगदान दिलं. केन विल्यमसन आणि वृद्धीमान सहा यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.