IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) संघानं शुक्रवारी आयपीएलच्या १४व्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. दीपक चहरनं ( Deepak Chahar) १३ धावांत ४ विकेट्स घेत पंजाब किंग्सचे ( Punjab Kings) कंबरडे मोडले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे पंजाब किंग्सला ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले आणि CSKनं ४ बाद १०७ धावा करून हा सामना सहज जिंकला. या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दीपक चहरला देण्यात आला. पण, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चहरची धुलाई झाली होती आणि त्यानं ३६ धावा देताना एकही विकेट घेतली नव्हती. तेव्हा एका चाहत्यानं त्याला, 'भाई अगला मॅच मत खेलना', असा मॅसेज केला होता. चहरनं पंजाबविरुद्धच्या सामन्यातील कामगिरी त्या चाहत्याला समर्पीत केली. रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे; इंग्लंडच्या माजी कर्णधाराची करारावर नाराजी
त्यानं ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकले आणि १८ चेंडू डॉट्स फेकले. त्याच्या या कामगिरीचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कौतुक केलं. दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर एका चाहत्यानं चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियावर चहरला पुढच्या सामन्यात खेळवू नका, असा मॅसेज केला होता. मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार!
चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना CSKच्या खेळाडूंनी पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्घ एकजुटीनं खेळ केला. दीपक चहरनं ( ४-१३) PBKS च्या तगड्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज देताना पंजाबला ८ बाद १०६ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले. मोईन अली ( ४६) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ३६*) यांनी सुरेख खेळ केला.
Web Title: IPL 2021 : Deepak Chahar dedicates best ever IPL performance to boy who messaged him 'Bhai agla match mat khelna'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.