नितीश राणा, देवदत्त पडिक्कल आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि या सर्वांनी त्यावर मात केली. नितीशनं तर दमदार कमबॅक केले आणि आता देवदत्त व अक्षर पुनरागमनासाठी फिट झाले आहेत. पण, दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्रमुख गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे ( Anrich Nortje) याचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला आणि तो आता क्वारंटाईन झाला आहे. अक्षर पटेलनंतर DCसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. SRHचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीला मिळाली वाईट बातमी; पाकिस्तानच्या फलंदाजानं दिला मोठा धक्का
ANIला सूत्रांनी सांगितले की,''तो भारतात आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता, परंतु त्याची चाचणी झाली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. तो सध्या क्वारंटाईन झाला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास तो किमान १० दिवसांसाठी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.'' नॉर्ट्जे पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका अर्ध्यावर सोडून आयपीएलसाठी भारतात दाखल झाला होता. त्याच्यासोबत क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स), कागिसो रबाडा ( दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) हेही भारतात दाखल झाले होते. IPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा!
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्यानंतर पहिल्यासामन्याआधी प्रमुख गोलंदाज अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार