लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्वत:च्याच चुकांमुळे पराभव ओढावून घेतला. एकवेळ विजयी मार्गावरुन वाटचाल केलेल्या दिल्लीला सुमार गोलंदाजीचा फटका बसला आणि राजस्थानने जबरदस्त पुनरागमन करत बाजी मारली. मात्र, आता या सामन्यात फॉर्ममध्ये असलेला प्रमुख वेगवान गोलंदाज खेळू शकला असता, अशी माहिती दिल्लीला मिळाली. कारण एका चुकीच्या रिपोर्टमुळे त्याला संघाबाहेर जावे लागले होते. जर तो राजस्थानविरुद्ध खेळला असता, तर कदाचित या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. हा वेगवान गोलंदाज म्हणजे एन्रीच नॉर्खिया. महेंद्रसिंग धोनीचं द्विशतक, पंजाब किंग्सविरुद्ध उतरवला तगडा संघ
कोरोना चाचणीचा चुकीचा रिपोर्ट आल्याने नॉर्खियाला विलगीकरणात जावे लागले होते. या चुकीच्या रिपोर्टनुसार नॉर्खिया कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र, आता तो शुक्रवारी संघासोबत जुळला असल्याची माहितीही मिळाली. आरटी-पीसीआर टेस्टमध्ये तीनवेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नॉर्खियाला संघासोबत जुळण्याची परवानगी मिळाली. महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, पंजाबविरुद्ध चुकल्यास माफी नाही मिळणार!
याबाबत माहिती देताना दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट केले की, ‘आमचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज आता क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे. कोविड-१९च्या चुकीच्या रिपोर्टनंतर एन्रीच नॉर्खिया टेस्टमध्ये तीन वेळा निगेटिव्ह आला आणि आता तो संघाच्या बायो बबलचा सदस्य झाला आहे. त्याची गोलंदाजी पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.’ महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान
दिल्लीने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नॉर्खिया म्हणाला की, ‘क्वारंटाईनमधून बाहेर येणे आणि ब्रेकफास्टदरम्यान सर्वांना पाहण्याचा अनुभव चांगला होता. आता सरावाला सुरु करण्यास उत्सुक आहे. स्टेडियममध्ये पुनरागमन करणे चांगले ठरणार असून भारतात आयपीएल होत आहे, हे खूप चांगले आहे. मैदानावरील पुनरागमन रोमांचक ठरेल.’
आयपीएलमध्ये चुकीच्या कोरोना रिपोर्टचा शिकार ठरलेला नॉर्खिया दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी कोलकाताचा फलंदाज नितिश राणा यालाही चुकीच्या कोरोना रिपोर्टमुळे क्वारंटाईनमध्ये जावे लागले होते.