मुंबई : चेन्नई सुपरकिंग्सने सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. सांघिक खेळाचे प्रदर्शन करत चेन्नईने राजस्थानचे कडवे आव्हान सहज परतावले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी छोटेखानी आक्रमक खेळी करतानाच चाणाक्ष नेतृत्त्वही केले. त्याने गोलंदाजांचा अचूक वापर करत राजस्थानला बॅकफूटवर नेले. या सामन्यात फलंदाजी करताना धोनीची फिटनेस लेव्हलही दिसून आली. रनआऊट होण्यापासून वाचण्यासाठी त्याने अप्रतिम डाईव्ह मारली. मात्र, यामुळेच आता तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही होत आहे.
IPL 2021: धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले!
३९ वर्षीय धोनीने आपली फिटनेस लेव्हल पुन्हा एकदा सिद्ध करताना सर्वांना चकीत केले. त्याने फलंदाजीला आल्यानंतर तिसºयाच चेंडूला कव्हरमध्ये ढकलले. यावेळी गोलंदाजी करत होता राहुल तेवटिया. चोरटी धाव घेण्यात तरबेज असलेल्या धोनीने एक रन घेण्यास चपळतेने क्रीझ सोडली, मात्र नॉन स्ट्राईकवरील रवींद्र जडेजाने लगेच त्याला माघारी धाडले आणि रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी धोनीने जबरदस्त डाईव्ह मारली. धोनीने बाद होण्यापासून स्वत:ला वाचवले, मात्र यामुळे त्याची विकेट गेली ती सोशल मीडियावर.
IPL 2021: "होय, मी चुकलो! माझं वय झालंय आणि...", महेंद्रसिंग धोनीनं प्रांजळ मनानं दिली कबुली
धोनीच्या या शानदार डाईव्हनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी २०१९ सालच्या वर्ल्डकप सेमीफायनलची आठवण काढली. न्यूझीलंडविरुद्ध धावांचा पाठलाग करतानाही धोनी धावबाद झाला होता. प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यावेळी भारताच्या सर्व मदार धोनीवर अवलंबून राहिल्या होत्या. काही शतांशच्या फरकाने तो क्रीझमध्ये पोहचू शकला नव्हता, पण त्याने त्यावेळीही अशीच डाईव्ह मारली असती, तर कदाचित आपण जिंकलो असतो, अशी प्रतिक्रिया आता क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर देत आहेत.
राजस्थानविरुद्ध खेळताना धोनीने नव्या विक्रमालाही गवसणी घातली. आयपीएलमध्ये एकाच संघाचे २०० सामन्यांत नेतृत्त्व करणारा धोनी पहिला कर्णधार ठरला. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्त्व करणारा भारतीय कर्णधार म्हणूनही धोनीने विक्रम नोंदवला. दुसºया स्थानी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली असून त्याने १२८ सामन्यांत नेतृत्त्व केले आहे.