Join us  

IPL 2021: धाेनीच्या चेन्नई एक्स्प्रेसचा थरारक विजय

कोलकाताला १८ धावांनी नमविले; आंद्रे रसेल, पॅट कमिन्सची झुंज ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 4:31 AM

Open in App

मुंबई : मुंबई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या षटकात बाजी मारताना कोलकाता नाइट रायडर्सचा १८ धावांनी पराभव केला. २२० धावा फटकावल्यानंतरही चेन्नईला विजयासाठी अखेरपर्यंत झुंजावे लागले.  यंदाच्या सत्रातील हा सर्वोत्तम सामना म्हणावे लागेल.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०२ धावा उभारल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने अर्धा संघ अवघ्या ३१ धावांत गमावला. मात्र, तरीही त्यांनी २०२ धावांची मजल मारत थरार निर्माण केला. याचे श्रेय द्यावे लागेल ते आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांना. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर य तिघांचा खेळ अधिक बहरला. रसेलने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाची पिटाई करीत कोलकाताला विजयी मार्गावर ठेवले होते. रसेल आणि कमिन्सच्या फटकेबाजीमुळे एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात कोलकाताने रंगत आणली. चेन्नईचे वेगवान गोलंदाज महागडे ठरले. त्यांच्याकडून अनेक चुकाही झाल्या. मात्र, अखेर त्यांनीच चेन्नईचा विजय साकार केला. रसेलने २२ चेंडूंत दिलेला ५४ धावांचा तडाखा व कमिन्सची ३४ चेंडूंतील नाबाद ६६ धावांची फटकेबाजी लक्षवेधी ठरली.  दीपक चहरने २९ धावांत ४ फलंदाज बाद केले.त्याआधी, फाफ डुप्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी दिलेली ११५ धावांची सलामी कोलकातासाठी घामटा काढणारी ठरली. ऋतुराजने ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा केल्या. डुप्लेसिसने चेन्नईच्या धावगतीला कमालीचा वेग देताना ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९५ धावा चोपल्या. वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन यांना काही प्रमाणात नियंत्रित मारा करता आला. कोलकाताला पहिल्या बळीसाठी १३ व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अष्टपैलू मोईन अलीनेही १२ चेंडूंत २५ धावांचा तडाखा दिला, तसेच धोनीनेही छोटेखानी आक्रमक खेळी करीत चेन्नईला दोनशेपार नेण्यात योगदान दिले.  पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, आंद्रे रसेल आणि कमलेश नागरकोटी यांनी दहाहून अधिकच्या इकॉनॉमी रेटने धावा बहाल केल्या. त्यांच्या सुमार गोलंदाजीचा  फायदा घेत ऋतुराज-प्लेसिस यांनी चेन्नईच्या धावगतीला वेग दिला.

महत्त्वाचेnदिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये २०० सामने खेळले.nसर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये कार्तिक, धोनी (२०८) व रोहित शर्मा (२०४) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी. n२०१९ पासून सीएसकेने चार शतकी भागीदारी केल्या असून, या सर्वांमध्ये फाफ डुप्लेसिसचा सहभाग. nऋतुराज गायकवाडचे चौथे आयपीएल अर्धशतक. पहिल्यांदाच त्याने एका सामन्यात चार षटकार ठोकले.n२०१५ पासून पॉवर प्लेमध्ये दीपक चहरने सर्वाधिक ३८ बळी घेतले. nवानखेडे स्टेडियमवर कधीही दोनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झालेला नाही.

टॅग्स :आयपीएल २०२१