IPL 2021 : MI Vs KKR T20 : १५३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अन् हातात विकेट्स असताना कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) सामना गमावतील असे कुणालाही वाटले नव्हते. पण, मुंबई इंडियन्सच्या ( MI) गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत दमदार पुनरागमन करताना १० धावांनी सामना जिंकला. कोलकाताला ७ बाद १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. KKRच्या या कामगिरीवर संघ मालक व बॉलिवूड किंग खान शाहरुख खान ( Shahrukh Khan) यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानंही त्याच्या खास शैलीत KKRचा समाचार घेतला. मुंबई इंडियन्सनं गमावलेला सामना खेचून आणला; राहुल चहर, ट्रेंट बोल्टनं 'गेम'च फिरवला!
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्यानं त्यांचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला. सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले. Andre Russell : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत पाठवला, अनेक विक्रमांचा पाऊस पाडला!
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKR साठी नितीश राणा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. हा सामना कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते. पण, राहुल चहरनं चार विकेट्स घेत सामनाच फिरवला. नितीशनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या, राहुल चहरनं २७ धावांत चार विकेट्स घेतल्या. कोलकाताला विजयासाठी अखेरच्या ३६ चेंडूंत ४० धावांची गरज होती. पण, मुंबईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना संघाला १० धावांनी विजय मिळवून दिला. कृणालनं १३ धावांत १, ट्रेंट बोल्टनं २७ धावांत २ विकेट्स घेतल्या. बुमराहनं २८ धावा दिल्या.WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video
शाहरुख म्हणाला, अत्यंत निराशाजनक कामगिरी, कोलकाता नाईट रायडर्सनी चाहत्यांची माफी मागायला हवी.
अखेरच्या सहा षटकांचा थरार...
- अखेरच्या सहा षटकांत ४० धावांची गरज, ही ट्वेंटी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये सोपी गोष्ट म्हणावी लागेल. अशा परिस्थिती लक्ष्याचा बचाव करणारा संघानं हार मानली, तर त्याचं नवल वाटायला नको. पण, मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) त्याला अपवाद ठरले.
- १५व्या षटकात राहुल चहरनं ९ धावा देताना MIला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानं त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेट फलंदाज नितीश राणाला ( ५७) बाद केले. क्रीज सोडून पुढे गेलेल्या नितीशला बाद करण्याची आयती संधी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकनं गमावली नाही.
- १६व्या षटकात कृणाल पांड्यानं दुसऱ्याच चेंडूवर KKRच्या शाकिब अल हसनला ( ९) बाद करून मोठा धक्का दिला. पण, पुढच्याच चेंडूवर कृणालनं KKRचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याचा झेल सोडला. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरेल असेच वाटले होते. जीवदान मिळाल्यानंतर रसेल थोडा सावध खेळला. त्या षटकात KKRला एकच धाव मिळाली.
- १७व्या षटकात जसप्रीत बुमराहनं ८ धावा दिल्या. त्यातील चार धावा या फ्री हिटवर आल्या. त्यामुळे अखेरच्या तीन षटकांत २२ धावा KKRला करायच्या होत्या. यात रोहित शर्मानंही आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना KKRच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केलं.
- १८व्या षटकात कृणालच्या गोलंदाजीवर रसेलला ( ५ धावांवर) जसप्रीतनं जीवदानं दिलं. आता रसेल घाबरत घाबरतचं खेळला. बॅट आणि चेंडू यांचा ताळमेळ त्याला राखता आलाच नाही. त्या षटकात तीनच धावा त्यांना करता आल्या.
- १९व्या षटकात बुमराहनं ४ धावा दिल्या आणि अखेरच्या षटकात KKRला १५ धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर बोल्टनं रसेलला बाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्यानं पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला. कोलकाताला ७ बाद १४२ धावाच करता आल्या. मुंबईनं १० धावांनी हा सामना जिंकला.