आयपीएलच्या मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. पण, यंदा CSKनं चांगली सुरुवात करताना गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्य आजही पूर्वीसारखेच आहे, परंतु त्याच्या फलंदाजीनं संघाची चिंता वाढवली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि सहा षटकं खेळण्याची संधी असूनही त्यानं १७ चेंडूंत केवळ १८ धावा केल्या. धोनीच्या या संथ खेळीमुळे CSKचा पराभवही झाला असता आणि याची कबुली धोनीनंही सामन्यांतर दिली. CSK २००+ धावा सहज करतील असे वाटत होते, परंतु त्यांना १८८ धावांवर समाधान मानावे लागले. महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार
"मला वाटतं आम्हाला आणखी धावा करता आल्या असत्या. मी खेळलेले पहिले सहा चेंडू आम्हाला इतर कुठल्या सामन्यात महागात पडले असते. जेव्हा तुम्ही मैदानात खेळत असता तेव्हा तुम्हाला कुणी अनफिट म्हटलेलं नक्कीच आवडणार नाही. या वयात कामगिरीची हमी देता येत नाही", असं धोनीनं कबुल केलं होतं. "मी वयाच्या २४ व्या वर्षी असताना कामगिरीची हमी देऊ शकत नव्हतो. तर आता ४० व्या वर्षी हमी देणं खूप कठीण आहे. निदान मी अनफिट असल्याचं बोट कुणी माझ्याकडे दाखवू शकत नाही हे माझ्यासाठी खूप सकारात्मक आहे", असंही धोनी म्हणाला.विराट कोहलीचा पारा चढला?; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे! Video
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यानंही याच मुद्यावर बोट ठेवताना फलंदाज म्हणून धोनीकडून अपेक्षा करणं सोडलं पाहिजे, असे मत व्यक्त केलं. तो म्हणाला,''फलंदाजीत धोनीकडून आणखी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. यष्टिंमागे अजूनही त्याला तोड नाही, परंतु CSKची फलंदाजांची फळी एवढी मोठी आहे की धोनी आराम करू शकतो. धोनी फॉर्मात यावा, ही सर्वांची इच्छा आहे. तो किती घातक ठरू शकतो हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु त्याच्याकडे आणखी चांगले खेळाडू आहेत.''